
छत्रपती संभाजीनगर : रुग्णांना उपचार, सुविधा देण्यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे शासनाचे धोरण आहे. रुग्णांना उपचार सुविधा देण्यात शासनासोबतच खासगी संस्थांचाही सहभाग आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी (ता. १४) व्यक्त केले.