
कोरोनाच्या सावटाखाली साजरी होणार अक्षय तृतीया
औरंगाबाद : साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया सण (Akshaya Tritiya) शुक्रवारी (ता.१४) सर्वत्र साजरा होणार आहे. कोरोनाचा सावट असल्याने सलग दुसऱ्या वर्षीही बाजारपेठेतील कोट्यावधीची उलाढाल ठप्प राहणार आहे. अक्षय तृतीयाच्या पुजेसाठी लागणारे मडकी, आंबे इतर साहित्य खरेदीसाठी गुरुवारी (ता.१३) बाजारपेठेत (Market) गर्दी झाली होती. घरात कोरोनाचे नियम पाळत हा सण साजरा करावा लगणार आहे.(Akshaya Tritiya Festival Celebrates Under Shadow Of Corona)
हेही वाचा: धनंजय-करुणा मुंडेंच्या प्रेमकथेचे रहस्य उलगडणार, सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
अक्षय तृतीयेला सोने-चांदी, वाहन, घर खरेदी करणे, गृहप्रवेश शुभ मानले जाते. यामुळे या दिवशी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. मात्र गेल्या वर्षापासून कोरोनामूळे लावण्यात आलेल्या लॉकाडाऊनमुळे (Lock Down) हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. या सणाच्या दिवशी कुटुंबातील दिवंगताना नैवेद्य दाखविण्यात येतो. तर सुहासिनीना अमरस पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. यंदाही यासाठी आंब्याची खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती. शहरात ५० रुपये ते दीडशे रुपये किलोने आंबे आणि घट १०० रुपये जोडीने विक्री झाला. यंदा सोने-चांदीचे दुकाने बंद आहेत. तर वाहनाचे शोरुमही बंद आहेत. या मुहुर्तावर केवळ बुकिंग करण्याची सुविधा काही सराफा व्यावसायिकांनी केली. तर काही शोरुम चालकांनीही बुकिंगची सुविधा दिली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर हे वाहनाची डिलव्हरी देणार आहे. तसेच काही गृहप्रकल्पाच्या ठिकाणी या मुहुर्तावर गृहप्रवेश होणार असल्याची माहिती क्रेडाईतर्फे (Credai) देण्यात आली आहे.
Web Title: Akshaya Tritiya Festival Celebrates Under Shadow Of
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..