Ambad Accident News : चिंचखेड फाट्याजवळ ट्रकला धडकून दुचाकीस्वार रोहन काळे जागीच ठार

Ambad Pachod road accident 2026 : अंबड-पाचोड मार्गावर चिंचखेड फाट्याजवळ ट्रकला धडकून २० वर्षीय रोहन काळे जागीच ठार; मित्र जखमी, पोलिसांनी ट्रक जप्त केला. गावकऱ्यांनी तत्काळ मदत केली; अंत्यसंस्कार बिड जिल्ह्यात होणार.
Ambad Pachod road accident 2026

Ambad Pachod road accident 2026

sakal

Updated on

अंबड : जालना जिल्हयातील अंबड -पाचोड मार्गावरील चिंचखेड फाटयाजवळ पाण्याचे फिल्टर जवळील उतारावर ट्रक उभा होता.या उभ्या ट्रकला पाठीमागून दुचाकीस्वार धडकल्याने यामध्ये दुचाकी युवक या अपघातात जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी (ता.5) दुपारी साडेचार पाच वाजेच्या दरम्यान घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबड -पाचोड महामार्गावर चिंचखेड फाट्यालगत वॉटर फिल्टर जवळील उतारावर गुरूवारी ट्रक उभा होता. अंबड शहराकडून आपल्या मामाकडे राहत असलेला रोहन मोहन काळे (वय 20) वर्ष हा बिड जिल्हयातील गेवराई तालुक्यातील आडगाव येथील असुन तो शिक्षणासाठी अंबड तालुक्यातील पागीरवाडी येथे मामाकडे शिक्षण घेत होता.या वर्षी रोहन हा बारावीला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com