Jalna Crime : अंबड राहुवाडीतांडा येथे घरफोडी सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळुन 5 लाख 87 हजार रुपयांची चोरी

Ambad house burglary : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील राहूवाडी येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 5 लाख 87 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. अंबड पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल.
Ambad Rahuwadi house burglary gold jewellery cash theft case

Ambad Rahuwadi house burglary gold jewellery cash theft case

sakal

Updated on

अंबड : जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील राहूवाडी तांडा येथे कोणीतरी अज्ञात चोरट्याने शुक्रवारी (ता.13) रात्री अकरा ते शनिवारी (ता.14) पहाटे पाच वाजेच्या दरम्यान येथील ग्रामस्थ राजेश सुरेश चव्हाण यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील पेटी ठेवलेले पत्नी, आई, भावजया व दोन मावश्या यांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळुन एकुण 5 लाख 87 हजार 500 रुपयांवर कोणीतरी अज्ञात चोरट्याने डल्ला मारला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com