'लोकप्रतिनीधींनी अधिकाऱ्यांवर दबावाचा प्रयत्न करू नये'- आमदार दानवे

राजकारण न करता समन्वय साधून कोरोना संसर्गाला आळा घातला पाहिजे असे मत शिवसेनेचे प्रवक्ते आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केले
Aurangabad
AurangabadAurangabad

औरंगाबाद: कोरोनाचा संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लॉकडाऊन (lockdown in Aurangabad) जाहीर केले आहे. या काळात लोकप्रतिनीधींनी प्रशासकिय अधिकाऱ्यांवर दबाब आणण्याचा प्रयत्न करू नये. राजकारण न करता समन्वय साधून कोरोना संसर्गाला आळा घातला पाहिजे असे मत शिवसेनेचे प्रवक्ते आमदार अंबादास दानवे (ambadas danve) यांनी व्यक्त केले आहे.

आमदार श्री. दानवे यांनी म्हटले आहे की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात शासनाने घालून दिलेले नियम डावलून शहरातील काही आस्थापना सुरु होत्या. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या आस्थापनांवर कारवाई केली होती अशा वेळी खासदार इम्तियाज जलील यांनी या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा व शासकीय नियमात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

Aurangabad
कौतुकास्पद! वृद्ध दाम्पत्याने बैलगाडीत जाऊन घेतली कोरोनाची लस

'जलील यांचे हे वर्तन जिल्ह्याच्या खासदाराला शोभत नाही याउलट पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, डॉक्टर्स व सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि जनतेच्या सहकार्यामुळे जिल्ह्यात वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भावाला काही प्रमाणात आळा बसला आहे हे विसरून चालणार नाही. अशावेळी राजकारण न करता या सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रशासनाशी किंवा अधिकाऱ्यांशी संघर्ष न करता समन्वय साधून योग्य रीतीने कार्य करण्याची गरज आहे त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहणे गरजेचे असल्याचे दानवे यांनी मत व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com