

Chhatrapati Sambhajinagar
esakal
अंधानेर: कन्नड शहराची तहान भागविणाऱ्या अंबाडी मध्यम प्रकल्पात आता केवळ १६ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवन वेगाने होत असून, शहराचा पाणीप्रश्न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर, पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने अंबाडी येथील चेंबरची युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवून अडथळे दूर केले आहेत.