Chhatrapati Sambhajinagar: इंधनासाठी पंपांवर रुग्णवाहिकाही रांगेत; अत्यावश्यक सेवादाते चिंतेत, प्रशासनाकडून हव्यात उपाययोजना

Ambulances Waiting in Fuel Queues: इंधनासाठी रुग्णवाहिकांनाही पंपावर रांगेत उभे राहावे लागत असल्याने अत्यावश्यक सेवांवर परिणाम होत आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: अत्यावश्यक सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकांनाही इंधनासाठी रांगेत लागावे लागल्याने चालकांनी नाराजी व्यक्त केली. शिवाय अत्यावश्‍यक सेवा कशी द्यावी, असा सवाल उपस्थित केला. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णवाहिका आणि जनरेटरसाठी आवश्यक इंधनाचा साठा उपलब्ध असल्याने कोणताही अडचण नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

अनेक पेट्रोल पंपांवर गुरुवारी (ता. २६) रुग्णवाहिका चालकांना इतर वाहनांप्रमाणेच रांगेत उभे राहावे लागल्याचे चित्र होते. दरम्यान, चालकांनी पेट्रोपपंप चालकांशी संवाद साधला. मात्र, उपयोग झाला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com