Ambulance Accident: साताऱ्यात रेणुका माता कमानीजवळ चारचाकीने रुग्णवाहिकेला कट मारून दुभाजकावर धडक; चालक गंभीर जखमी
Accident News: साताऱ्यात रुग्णवाहिकेला चारचाकीने अचानक कट दिल्याने ती दुभाजकावर धडकली. रुग्णवाहिका चालक गंभीर जखमी झाला असून रुग्णास काही इजा झाली नाही.
सातारा परिसर : शहरातील एका रुग्णालयातून रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला रेणूका माता कमानीजवळ अचानक एका चारचाकी वाहनाने कट मारला. यात रुग्णवाहिका दुभाजकावर धडकून चालक गंभीर जखमी झाला. हा प्रकार शनिवारी (ता. नऊ) रात्री उशिरा घडला.