
Chh. Sambhajinagar
sakal
शेंदूरवादा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खाम नदीला रविवारी (ता.28) महापूर आला असून या पुराच्या पाण्यामुळे शेंदूरवादा (ता.गंगापूर) येथील खाम नदीच्या तीरावर वसलेले द्वापार युगातील प्राचीन सिंधुरात्मक गणपती मंदिर पूर्णतः पाण्यात गेले असून भाविकांसाठी तेथे जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.