esakal | औरंगाबादेत लष्करी जवानाची गळफास घेऊन आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

aurangabad

औरंगाबादेत लष्करी जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: सहकाऱ्यांसोबत जेवण करून गप्पा मारल्यानंतर लष्करी जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी सहाच्या सुमारास छावणीतील लष्कर परिसरात उघडकीस आली. मल्हार राममूर्ती (२६, रा. कृष्णगिरी, तामिळनाडू, ह.मु. लष्कर निवास्थान) असे मृत जवानाचे नाव आहे. मल्हार यांनी शनिवारी रात्री सहकाऱ्यांसह नेहमीप्रमाणे जेवण केले. त्यानंतर हसतखेळत त्यांच्याशी गप्पा मारल्या. सर्व झोपी गेल्यानंतर मल्हार यांनी लाइनमनकडे असलेल्या दोरीने गळफास घेतला.

सकाळी सहाच्या सुमारास सहकारी उठल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर सुभेदार पोपट जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी मल्हार यांना बेशुद्ध अवस्थेत घाटीत दाखल केले. मात्र, सकाळी पावणेनऊच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मल्हार यांनी आत्महत्या का केली, हे मात्र अस्पष्ट आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद छावणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा: पोलिसांची साडेबारा हजार पदे भरली जाणार : गृह राज्यमंत्री देसाई

दुसऱ्या घटनेत जटवाडा भागातील मजुराने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. सुरेश हरिभाऊ मगरे (५०, रा. दत्तनगर, जटवाडा रोड) असे मृत मजुराचे नाव आहे. सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास सुरेश मगरे यांनी पत्र्याच्या छताच्या बल्लीला ओढणीने गळफास घेतला. हा प्रकार पाहून शेजाऱ्यांनी मगरे यांना फासावरुन उतरवीत घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मगरे यांना मृत घोषित केले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

loading image