Children Missing : पाच वर्षांत देशात २ लाख ७५ हजार किशोरवयीन मुले-मुली बेपत्ता

मागील काही वर्षात मानवी तस्करीच्या प्रकरणात वाढ
Children Missing
Children MissingSakal

छत्रपती संभाजीनगर : देशभरात १ जानेवारी २०१८ ते ३० जून २०२३ या दरम्यान २ लाख ७५ हजार १२५ अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाले. त्यामधील २ लाख ४० हजार ५०२ मुले-मुली सापडले तर ३४ हजार ६२३ मुला-मुलींचा शोध लागला नाही. याच दरम्यानच्या कालावधित महाराष्ट्रात ७ हजार २९० मुले-मुली बेपत्ता झाले.

यामध्ये ५ हजार २८९ मुलींचा समावेश होता. त्यापैकी ५ हजार २४६ मुली सापडल्या. आकडेवारीवर नजर टाकल्यास मुलांच्या तुलनेत मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण अडीचपट जास्त आहे.

मागील काही वर्षात मानवी तस्करीच्या प्रकरणात वाढ होत आहे. यासाठी लहान मुलींची चोरी, अपहरणासारखे प्रकार घडत आहे. लहान मुले-मुली बेपत्ता होत असल्याने पालकांनी काळजी घेण्याची गरज आहे. देशात १ जानेवारी २०१८ ते ३० जून २०२३ या साडेपाच वर्षांच्या कालावधित ६२ हजार २३७ मुले बेपत्ता झाली होती.

या दरम्यानच्या कालावधित नोंद असलेल्या व नोंद नसलेली ६६ हजार ६३८ मुले सापडली आहे. याच दरम्यान महाराष्ट्रात १ हजार ९९९ मुले बेपत्ता झाली होती. त्यापैकी नोंद असलेली व नसलेली तब्बल ९ हजार ९७ मुले सापडली. यामध्ये महाराष्ट्रात नोंद नसलेली; मात्र बेपत्ता असलेली मुले सापडली आहे.

देशात मुलींचा विचार केल्यास यामध्ये त्यांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. या कालावधीत देशात २ लाख १२ हजार ८२५ मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी १ लाख ७३ हजार ७८६ मुली सापडल्या, यामध्ये ३९ हजार ४२ मुली सापडल्या नाही. त्यांचा शोध सुरू आहे असे आकडेवारीवरून दिसून येते.

यामध्ये महाराष्ट्राचा विचार केल्यास ५ हजार २८९ मुली बेपत्ता झाल्या होत्या. त्यापैकी ५ हजार २४६ मुली सापडल्या, यामध्ये ४३ मुली सापडल्या नाहीत. त्यांचा शोध सुरू आहे. यामध्ये पालकांनी मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

ही आहेत कारणे

  • घरात सतत होणारे वाद-भांडणे

  • पालकांची अतिशय कडक शिस्त

  • सातत्याने अभ्यासाचा दबाव

  • बाह्य जगाचे आकर्षण

  • शिक्षणाची भीती

  • मोबाइलवर सोशल मीडियाचा मुक्त वापर

  • चित्रपटात रंगवलेले आभासी जग

  • अल्पवयात प्रेम प्रकरणे

  • पालक नोकरीला असल्याने पाल्यांकडे दुर्लक्ष

  • क्षुल्लक वादातून घरातून निघून जाणे

  • आर्थिक परिस्थिती, व्यसनापोटी घरात भांडण

  • शिक्षणाचा अभाव, संगत

समुपदेशकांचा सल्ला

  • पालकांनी मुलांसोबत सुसंवाद साधावा

  • मुलांसोबत मैत्रीचे नाते जपण्यासोबत आदरयुक्त धाकही आवश्यक

  • मित्र-मैत्रीण कोण, हेही पाहणे महत्त्वाचे

  • पालकांनी मुलांवर योग्य संस्कार होतील, असे स्वत:चे वर्तन ठेवावे

  • कुटुंबातील व्यक्तींनी मुलांसमोर वाद टाळावेत

  • मुलांना मारहाण न करता समजावून सांगावे

  • मुलांना आई-वडिलांचे प्रेम मिळावे

  • मुलांना सोशल मीडियापासून लांब ठेवावे

  • फोनवर ते काय पाहतात, यावर लक्ष ठेवणे

  • पालकांनी मुलांना पुरेसा वेळ द्यावा

  • कुटुंबासमवेत एकत्र जेवण, सुटीत मुलांसोबत एकत्रित बाहेर जाणे

  • मुलांना योग्य संस्कार देणे विसरू नये

प्रेमप्रकरणातून १२ ते १८ वयोगटातील जास्त मुली घरातून निघून गेल्याचे सर्वाधिक प्रकरणे आमच्याकडे येतात. यामध्ये पळवून घेऊन जाणारा हा नातेवाईक, ओळखीची किंवा शेजारचा असल्याचे जास्त दिसून येते. अभ्यासासाठी सातत्याने आई-वडील रागवल्याने तसेच ताण येत असल्याने, घरात मुलीच्या लग्नाची चर्चा सुरू असल्यास, आई-वडिलांचा मुलांशी संवाद नसल्यास, शिक्षणाचा अभाव अशी महत्त्वाची कारणे लहान-मुले घरातून निघून जाण्याची आहे.

- आशा शेरखाने-कटके, अध्यक्ष, बाल कल्याण समिती, छत्रपती संभाजीनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com