चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येताच अडकला | Aurangabad news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Police

चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येताच अडकला

औरंगाबाद - दोन दुचाकींची चोरी करुन त्या विक्री करण्यासाठी येताच दबा धरुन बसलेल्या क्रांती चौक पोलिसांनी चोरट्यास पकडले. ही कारवाई २१ जूनरोजी शिवाजी हायस्कूलसमोर करण्यात आली. तारेक अन्सारी असीफ अन्सारी (३८, घर नं. १३१४ प्लॉट नं. ०३ खुसरो मस्जीद मागे, टाईम्स कॉलनी) असे त्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. विशेष म्हणजे चोरट्याने चोरी केलेल्या दुचाकीची नंबर प्लेट बदलून विक्रीस आणली होती, तर दुसरी दुचाकी बॉन्डद्वारे विक्रीही केल्याचे समोर आले आहे.

क्रांती चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील विशेष पथकाचे निरीक्षक विकास खटके हे पथकासह गस्तीवर असताना दुचाकी चोरटा चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी हायस्कूलजवळ येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सदर ठिकाणी जाऊन दबा धरत संशयित येताच त्याला विक्रीस आणलेल्या दुचाकीसह पकडले.

त्‍याने सिडको भागातून दुचाकी चोरत नंबरप्लेट बदलल्याची कबुली दिली, तसेच एमजीएम परिसरातून चोरलेली दुसरी दुचाकी बॉन्डवर विक्री केल्याचेही आरोपी अन्सारी याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला अटक करुन सिडको पोलिसांच्या हवाली केले. ही कारवाई खटके यांच्याह नसीम पठाण, संतोष मुदीराज, नरेंद्र गुजर, इरफान खान, मनोज चव्हाण, संतोष सुर्यवंशी, नितीन नागरे यांच्या चमुने केली.

Web Title: Arrested As Soon As He Came To Sell Stolen Bike

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top