नामांतरानंतर औवेसी प्रथमच छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल; म्हणाले, हिंदुत्त्वाला धरून... | Chhatrapati Sambhajinagar

 Chhatrapati Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नामांतराला विरोध असणाऱ्या एमआयएम पक्षाचे अध्यक्ष आणि शाकदार असदुद्दीन ओवैसी हे नामांतरानंतर पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणूक आणि "द केरला स्टोरी" या चित्रपटावरून भाजपवर टीका केली आहे.

ज्या पंतप्रधानांनी संविधानाची शपथ घेतली ते पंतप्रधान एका धर्माचा विषय बोलतात. हिंदुत्त्वाला धरून सध्या देशात स्पर्धा वाढली आहे. नितीश कुमार सुरूवातीला भाजपसोबत होते, त्यांनी आधी भाजपसाठी मत मागितली त्यानंतर आता ते भाजपच्या विरोधात बोलत आहेत. काँग्रसे पक्ष म्हणजे नाटक कंपनी आहे असं म्हणत ओवैसी यांनी भाजप आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

 Chhatrapati Sambhajinagar
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

केरळा स्टोरीवर काय म्हणाले ओवैसी?

पंतप्रधान एका चित्रपटाचं प्रमोशन कसं करू शकतात? मुसलमानांचा मुद्दा उपस्थित करून जे आपलं पोट भरतात अशा लोकांना लाजा वाटल्या पाहिजे. काहीतरी खरं दाखवा. देशातील मुसलमानांनी आयएसआयचा कायमच विरोध केला आहे. त्यामुळे हे मुसलमानांनावर असे खोटे आरोप कसे काय करू शकतात?

या चित्रपटाचे सर्वांत मोठे प्रमोटर हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. हिटलरने सुद्धा ७० लाख ज्यू लोकांना मारलं होतं. आधी त्याने भडकाऊ भाषणापासून सुरूवात केली होती. या इतिहासापासून आपण शिकलं पाहिजे असं ओवैसी छत्रपती संभाजीनगर येथे माध्यमांसोबत बोलताना म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com