गरज संपताच आशा स्वयंसेविकांकडे दुर्लक्ष, दोन महिन्यांपासून औरंगाबाद महापालिकेने दिले नाही वेतन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

2Aurangabad_Municipal_Corporation_0

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जीव धोक्यात घालून घरोघरी जात आशा स्वयंसेविकांनी सर्व्हेक्षण केले. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाला उपाययोजना करताना मोठी मदत झाली.

गरज संपताच आशा स्वयंसेविकांकडे दुर्लक्ष, दोन महिन्यांपासून औरंगाबाद महापालिकेने दिले नाही वेतन

औरंगाबाद : कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जीव धोक्यात घालून घरोघरी जात आशा स्वयंसेविकांनी सर्व्हेक्षण केले. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाला उपाययोजना करताना मोठी मदत झाली. मात्र ऐन दिवाळीच्या सणात आशा स्वयंसेविकांना मानधनासाठी पाठपुरावा करावा लागत आहे. मंगळवारी (ता. १०) आशा स्वयंसेविकांनी महापालिकेत धाव घेत अतिरिक्‍त आयुक्‍त बी. बी. नेमाने यांच्याकडे व्यथा मांडल्या. नेमाने यांनी दोन महिन्यांचे मानधन आणि दिवाळी भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचे आश्‍वासन त्यांना दिले.

अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यात दोन दिवसांत रक्कम जमा होईल - राज्यमंत्री बच्चू कडू


आशा स्वयंसेविकांनी कोरोना संसर्गाच्या काळात महापालिका प्रशासनाला मोठी मदत केली. दोन महिन्याचे थकीत मानधन मिळावे यासाठी आशा आरोग्य कर्मचारी युनियनने अतिरिक्‍त आयुक्‍त बी. बी. नेमाने यांची भेट घेऊन विविध प्रश्‍न मांडले. कोरोना माहामारीच्या काळातील अतिरिक्‍त कामाचे प्रतिमहा ५००० रुपये देण्याची मागणी सीटू संघटनांनी केली होती. त्यावर १६ ऑक्टोबर २०२० पर्यंत आयुक्तांनी दोन हजार रुपये आशा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असे सांगितले होते.

आपले काय चुकले हे आधी पाहा, खासदार इम्तियाज जलील यांचा काँग्रेसला टोला

मात्र अद्याप हे पैसे मिळाले नाहीत. त्यावर हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील, सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्याचे मानधन दिवाळीपूर्वीच मिळेल व दिवाळी भेट म्हणून दोन हजार रुपये मिळतील, असे आश्‍वासन नेमाने यांनी दिले. यावेळी महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, सीटू संघटनेच्या मंगल ठोंबरे, पुष्पा पैठणे, संगीता जोशी, मानसी अभ्यंकर, फुरखा फातेमा यांची उपस्थिती होती.
 

Edited - Ganesh Pitekar

loading image
go to top