कबड्डी स्पर्धेत आष्टीच्या संघाची दमदार कामगिरी

कबड्डी स्पर्धेत आष्टीच्या संघाची दमदार कामगिरी
Published on: 
कबड्डी स्पर्धेत आष्टीच्या संघाची दमदार कामगिरी परतूर, ता. ३ : आष्टी येथील इंदूबाई इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये परतूर तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, जालना तसेच तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने २९ व ३० सप्टेंबर २०२६ रोजी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मुलींचे, तर दुसऱ्या दिवशी मुलांचे कबड्डी सामने घेण्यात आले. विविध शाळांमधील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. दुसऱ्या दिवशीच्या स्पर्धेचे उद्‍घाटन एपीआय सुरवसे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पीएसआय पवार, तालुका क्रीडा अधिकारी आशा लोंढे आणि तालुका क्रीडा मार्गदर्शक विकास काळे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम सोळंके होते. रमेशराव थोरात, जावेद शेख आणि प्राचार्य एम. बी. गुंजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.स्पर्धेतील अंतिम सामना शंभू महादेव माध्यमिक विद्यालय, वाटूर आणि लालबहादूर शास्त्री विद्यालय, आष्टी यांच्यात झाला. दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याने सामना चुरशीचा झाला. अखेर लालबहादूर शास्त्री विद्यालय, आष्टीच्या संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com