Aurangabad अटल इन्क्युबेशन सेंटरमार्फत उष्मायन कक्षासाठी सामंजस्य करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

atal incubation centre

निधी-भांडवल उभारण्यासाठी प्रभावी सादरीकरण करण्यासाठी सहाय्य केले जाणार

Aurangabad : अटल इन्क्युबेशन सेंटरमार्फत उष्मायन कक्षासाठी सामंजस्य करार

औरंगाबाद : नाविन्यपुर्ण संकल्पनावर आधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी अटल इक्युबेशन सेटंरमार्फत तिसरे उष्मायन कक्ष (स्पोक सेंटर) स्थापण्यासाठी छत्रपती शाहु महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कक्षाच्या स्थापनेसाठी छत्रपती शाहु महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे.

उष्मायन कक्षामार्फत स्टार्टअपला त्यांच्या नाविण्यपुर्ण संकल्पनांना शाश्वत उद्योगात रुपांतर करण्यासाठी व्यासपीठ उलब्ध करुन दिले जाईल. ऑफीस स्पेस, मेंटरिंग सपोर्ट (तांत्रिक-उद्योजकीय), मार्केटींग सपोर्ट, कायदेशीर सपोर्ट, नेटवर्कींग सपोर्ट, आयपी सपोर्ट, उद्योगांचा प्रकल्प अहवाल तयार करणे, निधी-भांडवल उभारण्यासाठी प्रभावी सादरीकरण करण्यासाठी सहाय्य केले जाणार आहे.

महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांमधील नाविन्यपुर्ण संकल्पनांना प्रोत्साहन देवुन शाश्वत उद्योगात रुपांतर करणे हा कक्ष स्थापने मागागील उद्देश आहे असे मत अटल इक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित रंजन यांनी व्यक्त केले. जास्ती जास्त विद्यार्थ्यांनी या सेंटरच्या सोयी-सुविधांचा लाभ घ्यावा असे छत्रपती शाहु महाराज अभियांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे यांनी सांगितले. यावेळी उष्मायन प्रबंधक डॉ. नवीन खंदारे, डॉ. सुरज करपे यांची उपस्थिती होती.