छत्रपती संभाजीनगर : क्रांती चौक पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आणि पोलिस कॉलनीसमोरच असलेल्या विवेकानंद कॉलेजजवळील एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी ८ लाख ८९ हजारांची रोकड लांबविली..एक डिसेंबरला पहाटे साडेतीननंतर समर्थनगर रोडवर हा प्रकार घडला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.विकास हुकूमचंद निकाळजे (वय ४०, रा. तिरुपती पार्क, गुरुसहाणीनगर, एन ४, सिडको) यांनी तक्रार दाखल केली. निकाळजे हे एसबीआय बँकेच्या क्षेत्रीय कार्यालयात डेप्युटी मॅनेजर म्हणून; तसेच एटीएम मॅनेजर म्हणून काम करतात. ता. एक डिसेंबरला दुपारी दोनला निकाळजे यांना एटीएममध्ये कॅश भरणाऱ्या एजन्सीच्या प्रतिनिधीचा कॉल आला..त्यांनी विवेकानंद कॉलेजच्या गेटला लागून असलेल्या एटीएमचा दरवाजा जळालेला असून पूर्ण उघडा आहे. आतमधील कॅसेट आणि रोख रक्कमदेखील दिसून येत नसल्याची माहिती दिली. निकाळजे यांनी वरिष्ठांसह घटनास्थळ गाठले. त्यांनी पाहणी केली असता, कॅमेऱ्यावर स्प्रे मारल्याचे दिसून आले. चोरट्यांनी मशीनमधील ८ लाख ८९ हजारांची रक्कम लांबविल्याचे लक्षात आले. निकाळजे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.कारचा वापरक्रांतीचौक पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरवात केली आहे. ३ वाजून १५ मिनिटांनी चोरटे एटीएममध्ये शिरल्याचे समोर आले आहे. एक चोरटा बाहेर दिसत असून, त्यांनी स्विफ्ट कार किंवा क्रेटा कार वापरल्याचा पोलिसांचा अंदाज आहे..सॉफ्टवेअरशी संपर्क झाला खंडितबँक अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करताना एटीएमबाहेर असलेल्या आणि आतमध्ये असलेल्या सीसीटीव्हीवर काळ्या गडद रंगाचा स्प्रे मारला. यानंतर त्यांनी मशीनमधील ईएसएस नावाची सेक्युरिटी सिस्टीम निष्क्रिय केली. यावेळी पहाटे ३ वाजून २३ मिनिटांनी एटीएम मशीनचा सॉफ्टवेअरशी संपर्क खंडित झाला. यानंतर गॅस कटरने पत्रा कापत चोरट्यांनी रक्कम लांबविली..Suresh Bankar : मतदारांचा कौल विजयासारखाच; सिल्लोडमध्ये बोगस मतदानाचा आरोप – सुरेश बनकर.२४ तासांपूर्वी बार्शी येथे घडली अशीच घटनारविवारी पहाटे बार्शी शहरात परंडा रोडवर चोरट्यांनी एसबीआय बँकेच्या एटीएमलाच लक्ष्य करीत २३ लाख रुपये पळविले होते. रविवारी पहाटे हा प्रकार घडला. या घटनेतदेखील चोरट्यांनी सीसीटीव्हीवर स्प्रे मारल्याचे समोर आले आहे. अवघ्या चोवीस तासांत अशाच पद्धतीने विवेकानंद कॉलेजवळ एटीएम फोडण्यात आले. यामुळे अशा प्रकारात साम्य असल्याने आता पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.