ATM Robbery : एटीएम फोडून लांबविली तीन लाखांची रोकड; पडेगावातील मिसबाह कॉलनीतील प्रकार
Crime News : पडेगाव येथील मिसबाह कॉलनीतील एसबीआय एटीएम फोडून चोरट्यांनी दोन लाख ९५ हजार २०० रुपयांची रोकड लांबवली. सीएमएस कंपनीच्या कैलास कांबळे यांच्या फिर्यादीवरून छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : पडेगाव परिसरात गॅस कटरने भारतीय स्टेट बॅंकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी तब्बल दोन लाख ९५ हजार २०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १८ जूनच्या पहाटे साडेतीन वाजता समोर आली.