esakal | सुनेला विष पाजून मारण्याचा प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

crime

सुनेला विष पाजून मारण्याचा प्रयत्न

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : सुनेचा शारिरिक व मानसिक छळ केल्याने तिने महिला सहायता कक्षात दिलेली फिर्याद आपसात मिटवून घेऊ म्हणून बोलावले आणि विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार १५ सप्टेंबररोजी दुपारी घडला. या प्रकरणी जयभिमनगर, टाऊन हॉल परिसरातील सुनेने दिलेल्या फिर्यादीवरुन पती, दीर, सासू, दोघी नणंद अशा पाच जणांविरोधात बेगमपूरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी पतीसह दीरास अटक केली. तर पतीने दिलेल्या तक्रारनुसार त्याच्या सासरचे गौतम काकडे, आकाश गजीले, विजय काकडे, दोन महिला यांनी कौटुंबिक कारणातून मारहाण केल्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा: 'खासदार इम्तियाज जलील यांनी राजकारण करु नये'; पाहा व्हिडिओ

याप्रकरणी हर्सूल परिसरातील सुनेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पतीसह सासरचे मंडळी फिर्यादी सुनेला पैशांच्या कारणावरुन शारिरिक व मानसिक त्रास देत असत. दरम्यानच्या काळात सुनेने महिला सहायता कक्षात धाव घेतली होती. तेव्हा महिला सहायता कक्षातील प्रकरण आपसात मिटवून घेऊ असे म्हणत सासरच्या मंडळींनी सुनेला बोलावून घेतले, आणि नवरा व दीराने तीचे हातपाय धरुन ठेवले, तर सासूने सुनेला विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणातील दोघी नणंद यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. याप्रकरणी सुनेच्या फिर्यादीवरुन आरोपी नवरा अनिल दगडुजी वानखेडे, दीर अशोक दगडुजी वानखेडे, सासू गयाबाई दगडुजी वानखेडे (रा. सर्व जयभिमनगर, टाऊन हॉल), नणंदा सुनीता अनील निकाळजे, रंजना हरीश्चंद्र दाभाडे या पाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पती अनिल वानखेडे आणि दीर अशोक वानखेडे या दोघांना पोलिसांनी अटक केली असून गुरुवारी (ता.१६) न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दोघा आरोपी भावांना शनिवारपर्यंत (ता.१९) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

loading image
go to top