
घनसावंगी : नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी यासाठी तेलंगण राज्याच्या धर्तीवर राज्य सरकारने वाळूचे नवीन धोरण आणले. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी घनसावंगी तालुक्यातील सात वाळू घाटांतून वाळू उत्खनन व वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी खनिकर्म विभागामार्फत प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार ठिकठिकाणी ग्रामसभा घेऊन लिलावांसाठी संमती घेण्यात आली असून लवकरच अंतिम प्रकिया सुरू केली जाणार आहे.
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने २८ जानेवारी २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये नवीन सुधारित वाळू धोरण निर्गमित केले होते. परंतु नागरिकांना स्वस्त दराने रेती उपलब्ध करुन देणे व अनधिकृत उत्खननास आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत रेती उत्खनन, साठवणूक व्यवस्थापन व ऑनलाइन प्रणालीद्वारे विक्री करण्यासाठी सर्वकष धोरण तयार केले आहे. नव्या वाळू धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खनिकर्म विभागाने वाळू घाटांचे सर्वेक्षण करून तांत्रिक उपसिमती व तालुकास्तरीय समितीच्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासंह लिलावास योग्य असलेल्या घाटांतून वाळू उत्खनन व उत्खनन केलेल्या वाळू डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन करण्यासाठी लिलावांची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार या वाळू घाटांच्या गावातील वाळू लिलावांची प्रक्रिया राबविण्यासाठी ग्रामपंचायत व गावकऱ्यांची संमती घेण्यासाठी ग्रामसभा घेण्यात आल्या.
दहा लाखांचा दंड वसूल
शिवनगाव, उक्कडगाव, बाणेगाव, मुद्रेगाव, लिंगसेवाडी, सौदलगाव बुद्रूक, शेवता, जोगलादेवी, रामसगाव, भोगगाव, राजाटाकळी या गोदवरी पट्ट्यातील गावांतील घाटांत बॅरजेस व गोदावरी नदीत पाणी असल्यामुळे हे वाळू घाट पाण्यात आहेत. त्यामुळे येथील लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली नसली तरी या भागात क्रेनद्वारे वाळूचा अवैध उपसा होत आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाने येथे कारवाई करावी अशी मागणी होत आहे. घनसावंगी तालुक्यात एक एप्रिल २०२३ ते आजपर्यंत २० कारवाया करण्यात आल्या. यातून १५ लाख ९७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला असून त्यापैकी १० लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
तालुक्यातील वाळू घाटांतील वाळू लिलावांची प्रक्रिया राबविण्यात येत असून शासनांच्या नव्या धोरणानुसार नागरिकांना ६०० रुपये प्रति ब्रास याप्रमाणे वाळू स्वस्त दरात मिळणार आहे. या गावांतील वाळू घाटांचा लिलाव होण्यासाठी उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांनी या वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे.
— योगीता खटावकर, तहसीलदार, घनसावंगी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.