
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या तिजोरीत एकीकडे खडखडाट असताना दुसरीकडे कंत्राटी कर्मचारी पुरविणाऱ्या एजन्सींना दीड वर्षात तब्बल २४ कोटीपेक्षा जास्त अतिरिक्त रक्कम देण्यात आल्याचे आधी कुणाच्याही लक्षात आले नाही. शेवटी लेखापरीक्षणातून हा प्रकार समोर आला. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत जादू होऊन रक्कम गायब झाल्याची चर्चा होती. दरम्यान, एजन्सीकडून ही रक्कम वसूल करण्याची नोटीस बजावण्यात आल्याचे प्रशासकांनी बुधवारी (ता. २३) सांगितले. त्यात महाराणा एजन्सीकडे २३ कोटी, गॅलॅक्सी व अशोका एजन्सीकडे अनुक्रमे ९९ लाख व ४५ लाख अतिरिक्त गेले असल्याचे त्यांनी नमूद केले.