
छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुल समितीचे २०१९ ते २०२४ पर्यंतच्या खात्याचे स्वतंत्रपणे ऑडिट करण्यात येत आहे. यात आतापर्यंत २७ हजार पावत्या तपासण्या आलेल्या आहेत. २१ कोटींव्यतिरिक्त समितीत दर दिवशी जमा होणाऱ्या पैशांतही मोठी तफावत दिसून येत आहे. यामुळे खात्यात जमा झालेल्या रकमेतही मोठा घोटाळा होण्याची शक्यता आहे.