

Chhatrapati Sambhajinagar
esakal
कन्नड: तालुक्यातील औराळा ३३ केव्ही उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या औराळी शिवारात महावितरणच्या निगरगट्ट कारभारामुळे शेतकऱ्यांच्या जिवाला घोर लागला आहे. शेतातील पाऊलवाटेवर वीजतारा मृत्यूचा स्पर्श होईल इतक्या खाली आल्या असून, ‘एखादा बळी गेल्यावरच प्रशासनाला जाग येईल का?’ असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत.