Aurangabad By Election : जिल्ह्यात १८५ जागांसाठी पोटनिवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election

Aurangabad By Election : जिल्ह्यात १८५ जागांसाठी पोटनिवडणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्ह्यातील १२८ ग्रामपंचायतीमधील ग्रामपंचायतीमधील १८५ सदस्यांच्या रिक्त जागांसाठी २१ डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सदस्यांचे आकस्मिक निधन, राजीनामा, अपात्र ठरल्याने रद्द झालेले सदस्यत्व आणि अन्य कारण रिक्त झालेल्या सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यामुळे जिल्ह्यातील पोटनिवडणूक होत असलेल्या १२८ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात निवडणुक आचारसंहिता लागू झाली आहे.

हेही वाचा: सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

या निवडणुकीसाठी इच्छुकांनी ३० नोव्हेंबरपासून ६ डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच ७ डिसेंबरला छाननी होणार आहे. अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख ९ डिसेंबर आहे. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. तर २१ डिसेंबरला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मदतान होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाणार आहे.

जिल्ह्यातील पोट निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती (लाल गोल) व तालुकानिहाय सदस्यांची संख्या.

जिल्ह्यातील पोट निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती (लाल गोल) व तालुकानिहाय सदस्यांची संख्या.

loading image
go to top