औरंगाबाद-नगर रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीचा चुराडा,एक जण ठार | Aurangabad Accident News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Accident
औरंगाबाद-नगर रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीचा चुराडा,एक जण ठार

औरंगाबाद-नगर रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीचा चुराडा,एक जण ठार

वाळूज (जि.औरंगाबाद) : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भरधाव कंटेनरने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीचा चुराडा होऊन एक जण ठार, तर एक जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (ता.१६) रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास औरंगाबाद-नगर महामार्गावरील वाळूज जवळ झाला. मानेगाव (ता.शेगाव, जि.बुलडाणा) येथील राजेश अरुण बघे (वय २३) व गजानन प्रल्हाद राहाटे (२७) हे राजेश बघे याचा मित्र मंगेश रतीय याला भेटून चिखली (ता.हवेली, जि.पुणे) येथुन वाळूजमार्गे (Waluj) बुलडाणा येथे दुचाकीवरुन (एमएच १२ एचजे २००९) जात होते. ते वाळुज जवळील ग्रिनगोल्ड कंपनीसमोर आले असता महामार्गाच्या कडेला दुचाकी उभी करुन गजानन रहाटे हा लघुशंकेसाठी गेला. तर राजेश बघे हा दुचाकीजवळ उभा होता. त्याचवेळी नगर कडुन येणाऱ्या कंटेनरने (एमएच १४ जीयु -३२३१) अन्य एका वाहनास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी व राजेश बघे याला जोराची (Aurangabad)धडक दिली.

हेही वाचा: प्रोटोकाॅल बाजूला ठेवून केंद्रीय मंत्री कराडांनी प्रवाशावर केले उपचार

मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता झालेल्या या अपघातात राजेश बघे हा जवळजवळ १० त १२ फुट पुढे फेकला गेल्याने गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. तर लघुशंका करणाऱ्या गजानन राहाटे याला दुचाकीचे सायलंसर उडुन लागल्याने तो जखमी झाला. या अपघाताची माहीती मिळतात घटनास्थळी नागरीकांची गर्दी झाली. दरम्यान वाळुज पोलीसांनी धाव घेत दोघांनाही खासगी वाहनातून उपचारार्थ घाटीत दाखल केले असता उपचारादरम्यान राजेश बघे यांचा मृत्यु झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. या प्रकरणी वाळुज पोलीस ठाण्यात गजानन प्रल्हाद राहाटे यांच्या फिर्यादीवरुन कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top