प्रोटोकाॅल बाजूला ठेवून केंद्रीय मंत्री कराडांनी प्रवाशावर केले उपचार | Bhagwat Karad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhagwat Karad
प्रोटोकाॅल बाजूला ठेवून केंद्रीय मंत्री कराडांनी प्रवाशावर केले उपचार

प्रोटोकाॅल बाजूला ठेवून केंद्रीय मंत्री कराडांनी प्रवाशावर केले उपचार

औरंगाबाद : केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) पेशाने डाॅक्टर आहेत. सोमवारी (ता.१५) विमानात प्रवास करत असताना एक प्रवासी अचानक तब्येत बिघडल्याने खाला पडला. याची माहिती मंत्री कराड यांना मिळाली. त्यांनी क्षणाचाही विचार न करता सदरील प्रवाशावर तातडीने उपचार केले. यावेळी त्यांनी सर्व प्रोटोकाॅल बाजूला ठेवले होते. विमान होते इंडिगो (Indigo Airline) कंपनीचे. त्यातून अर्थ राज्यमंत्री भागवत कराड प्रवास करत होते. कराड आपल्या फेसबुक पोस्टमध्ये या घटनेविषयी लिहितात, की आपल्या अनुभवामुळे जेव्हा एखाद्या गरजूला मदत होते, तेव्हा मिळणारे समाधान हे खूप मोठे असते. याची काल परत एकदा अनुभूती घेतली. (Aurangabad)

हेही वाचा: पेट्रोल-डिझेलच्या किंमती अमेरिकेत ठरतात, रावसाहेब दानवेंचा दावा

आपली भारतीय संस्कृती आपल्याला कायमच हे शिकवते. एकमेका साह्य करु अवघे धरु सुपं, संतांची ही शिकवण कायम लक्षात ठेवा व मदतीसाठी पुढाकार घ्या, असे आवाहन कराड यांनी सर्व नागरिकांना केला आहे.

loading image
go to top