esakal | सिल्लोड-औरंगाबाद रस्त्यावर अपघात, तरुण जागीच ठार

बोलून बातमी शोधा

file photo
सिल्लोड-औरंगाबाद रस्त्यावर अपघात, तरुण जागीच ठार
sakal_logo
By
सचिन चोबे

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : ट्रॅक्टर व दुचाकीच्या अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी (ता.२८) रोजी दुपारच्या सुमारास सिल्लोड-औरंगाबाद रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ घडली. भगवान रामदास पांढरे (वय, ३०, रा.आव्हाना ता.भोकरदन) असे अपघातातील ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सिल्लोडकडे मका घेऊन येत असलेला ट्रॅक्टर व सिल्लोडकडून भवनकडे जाणाऱ्या दुचाकीचा (एमएच २० इएम-७६१७) सिल्लोड-औरंगाबाद रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ अपघात झाला. त्यात पांढरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटला. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.