

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: राज्यभरात गाजलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळ्यात जिल्हाभरातील ३१ हजार ४०१ ठेवीदारांच्या एकूण ३३८ कोटी ९१ लाख ५३ हजार १०८ रुपयांच्या ठेवी अजूनही अडकलेल्या आहेत. प्रशासक समितीला साडेतीन वर्षांत १० टक्केही कर्ज वसुली करता आलेली नसल्याचे प्राप्त आकडेवारीवरून समोर आले. त्यामुळे ठेवीदार आणखीनच अस्वस्थ झाले. कर्ज वसुलीसाठी ठोस पावले उचलून आमच्या ठेवी आम्हाला परत करा, अशी गळ मंगळवारी (ता.२४) प्रशासक समितीला ठेवीदारांनी घातली.
आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याचे मुख्य लेखापरीक्षक तथा प्रशासक समितीचे अध्यक्ष सुरेश काकडे यांची भेट घेत पुन्हा एकदा कैफियत मांडली. आयुष्याची जमापुंजी आम्ही बँकेत ठेवली, आता मुलांच्या शिक्षणासाठी पैसा कुठून आणायचा, आम्हा ज्येष्ठ नागरिकांना आता कोण आधार देणार? कर्जदारांवर कडक कारवाई करा आणि आम्हाला आमचे पैसे परत करा.