esakal | औरंगाबाद बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंदला असहकार, व्यवहार सुरुच | Maharashtra Bandh In Aurangabad
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Agriculture Producing Market Committee

औरंगाबाद बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंदला असहकार, व्यवहार सुरुच

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता.११) राज्यभरात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसतर्फे बंद (Maharashtra Bandh) पाळण्यात येत आहे. औरंगाबाद शहरात याला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. महाविकास आघाडीच्या ताब्यात असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती मात्र व्यापाऱ्यांनी सुरू ठेवली होती. बाजार समितीमधील भाजी मंडई नियमित वेळेत सुरू होती, अशी माहिती बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली. बाजार समितीवर महाविकास आघाडीचे प्रशासक (Aurangabad) आहे असे असतानाही व महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) पक्षांतर्फे बंदचे आवाहन केल्यानंतर ही बाजार समितीतील भाजी मंडई सुरू होती. नियमितपणे रात्री शेतकरी शेतमाल घेऊन बाजार समितीत दाखल झाले होते.

हेही वाचा: औरंगाबादेत गळा चिरुन प्राध्यापकाचा निर्घृण खून

सकाळी साडेदहा वाजेपर्यंत भाजी मंडई नियमितपणे सुरू होती. रोजच्या प्रमाणे उलाढालही झाली. यात धान्य मार्केट बंद होते. मात्र इतर सर्व गोष्टी सुरळीत सुरु होत्या. टीव्ही सेंटर व इतर परिसरात महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी प्रत्येक दुकानात जात उद्या बंद ठेवण्याच्या विनंती दुकानदारांना केली. एवढेच नव्हे तर बाजार समितीवर शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे वर्चस्व आहे. प्रत्येकी चार-चार प्रशासक या बाजार समितीवर असतानाही भाजी मंडई सुरू होती. यामुळे महाविकास आघाडी सरकारातील सत्ताधारी पक्षांतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये बाजार समितीमधील भाजी मंडई व इतर व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला नाही व आपले आस्थापना सुरू ठेवल्या.

loading image
go to top