औरंगाबाद : गॅस कटरने ATM कापून दीड लाखांचा ऐवज लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad ATM robbery

औरंगाबाद : गॅस कटरने ATM कापून दीड लाखांचा ऐवज लंपास

वाळूजमहानगर - गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम कापून चोरट्यांनी सुमारे एक लाख अडूसष्ट हजार रुपयांची रक्कम लंपास केली. वाळूज परिसरातील वडगाव (को.) येथे मंगळवारी मध्यरात्री घडली.वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव (को.) येथील अण्णा भाऊ साठे चौकात शॉप नंबर १२ मध्ये युनियन बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे.

चोरट्यांनी या एटीएममध्ये प्रवेश करत आतील सीसीटीव्हीचे कनेक्शन तोडून गॅस कटरने एटीएममशीन कापून आतील १ लाख ६३ हजार रुपये लंपास केले. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Aurangabad Atm Cutting By Gas Cutter Robbery Crime News Theft

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top