औरंगाबाद : दृष्टी कमी झालेल्यांसाठी ‘लार्ज प्रिंट’

बालभारतीच्या वतीने विभागात चार हजार १८६ पुस्तकांचे वाटप
Aurangabad Balbharti Large print books Distribution
Aurangabad Balbharti Large print books Distributionsakal
Updated on

औरंगाबाद : डोळ्याची दृष्टी कमी झाल्याने मुलांना सामान्य पाठ्यपुस्तके वाचनात अडचणी निर्माण होतात. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर व शैक्षणिक प्रगतीवर होतो. त्यामुळे ज्या मुलांची दृष्टी कमी झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार मोठ्या अक्षरांची पाठ्यपुस्तके शासनाच्या ‘बालभारती’ या पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाकडून मोफत दिली जातात. २०२२-२३ या नवीन शैक्षणिक वर्षासाठी औरंगाबाद विभागातील अंशतः अंध असलेल्या एकूण ४ हजार १८६ दिव्यांग मुलांना लार्ज प्रिंट पुस्तकाचे घरापर्यंत वाटप करण्यात आले आहे.

अंशतः दृष्टी कमी झालेल्या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी छापण्यात आलेली पुस्तके वाचण्यास अडथळा येतो. त्याचा परिणाम या विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनावर होतो. परिणामी, त्यांची शैक्षणिक प्रगती खुंटते. या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखे विना अडथळा पुस्तके वाचता यावीत, यासाठी बालभारतीकडून मुलांच्या दृष्टी क्षमतेनुसार मोठ्या अक्षरात पुस्तके छपाई करून दिली जातात.

त्या अनुषंगाने त्या-त्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून या लार्ज प्रिंट पुस्तकांची मागणी केली जाते. २०२२-२३ या नवीन शैक्षणिक वर्षासाठी औरंगाबाद विभागातील जालना, बीड, औरंगाबाद व हिंगोली या चार जिल्ह्यातील शिक्षण विभागामार्फत एकूण ४ हजार १८६ प्रतींची मागणी बालभारतीकडे करण्यात आली होती. या सर्व पुस्तकांचे वितरण बालभारतीकडून ३१ मेपूर्वीच करण्यात आले आहे.

ज्या अंशतः अंध विद्यार्थ्यांना नियमित पाठ्यपुस्तके वाचन करताना अडचणी येतात, अशा विद्यार्थ्यांकरिता बालभारतीकडून अक्षरांची फॉन्ट साइज वाढवून मोठ्या आकाराची (लार्ज प्रिंट) नियमित पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जातात. सदरील पुस्तके दरवर्षी बालभारतीकडून आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिली जातात.

- एस.एम. पवार, भांडार व्यवस्थापक, बालभारती, औरंगाबाद

जिल्हानिहाय वितरण

  • औरंगाबाद ६६७

  • हिंगोली ५९७

  • मनपा औरंगाबाद १९२

  • जालना ८५१

  • बीड ८७९

  • एकूण ४१८६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sandu Tukaram Karhale Freedom Fighter Death
Chhatrapati Sambhajinagar
Yellow date farming success story in Marathwada earning Rs 3 lakh per acre
Who can apply for BAMU direct admission 2026?
Marathi News Esakal
www.esakal.com