esakal | बेगमपुरा-पहाडसिंगपुरा वॉर्डाला तीर्थक्षेत्राचा दर्जा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जगप्रसिद्ध औरंगाबाद लेणी, बिबी का मकबरा, थत्ते नहर अशा अनेक प्राचीन वास्तू , जुने वाडे तसेच प्रेक्षणीय स्थळे असल्यामुळे येथे दर्शनासाठी व भेट देण्यासाठी भाविक व पर्यटक येतात.

बेगमपुरा-पहाडसिंगपुरा वॉर्डाला तीर्थक्षेत्राचा दर्जा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - विविध धार्मिक व जागतिक वारसा लाभलेल्या शहरातील बेगमपुरा-पहाडसिंगपुरा वॉर्डाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.

 या वॉर्डाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. 

क्‍लिक करा : बुडाला लागलेल्या तिजोरीत जमा झाले १९ कोटी रुपये

बेगमपुरा-पहाडसिंगपुरा ही शहरातील सर्वांत जुनी वसाहत असून, या प्रभागात पुरातन जनार्दन स्वामी यांचा मठ, सद्गुरू निपट निरंजन महाराजांचे समाधी मंदिर, गोगाबाबा मंदिर, गोगाबाबा टेकडी, हनुमान टेकडी, जैन समाजाचे मुनी मिश्रीलाल महाराजसाहेब यांनी स्थापन केलेल्या गणेशलाल महाराज साहेब यांचे समाधिस्थळ गुरू गणेशनगर येथे आहे. दर अमावास्येला राज्य तसेच दक्षिण भारतातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. 

हेही वाचा : वाहन माझ्या समर्थकांनी नव्हे, भाजप कार्यकर्त्यांनी फोडले - किशनचंद तनवाणी

तसेच जगप्रसिद्ध औरंगाबाद लेणी, बिबी का मकबरा, थत्ते नहर अशा अनेक प्राचीन वास्तू , जुने वाडे तसेच प्रेक्षणीय स्थळे असल्यामुळे येथे दर्शनासाठी व भेट देण्यासाठी भाविक व पर्यटक येतात. त्यामुळे या प्रभागास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत या वॉर्डाचे नगरसेवक सचिन खैरे यांनी सादर केला होता. त्यांच्या या प्रयत्नामुळे बेगमपुरा-पहाडसिंगपुरा या प्रभागास तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर झाला आहे.

Video : चंद्रशेखर आझाद यांच्या हुंकार रॅलीचा घुमला आवाज 

loading image
go to top