esakal | मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शिवसेनेच्या मंत्र्याकडूनच केराची टोपली; मास्क न घालता विजयानंतर फोटोसेशन

बोलून बातमी शोधा

abdul sattar after result.

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. औरंगाबादमध्ये रोजचे दिड हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शिवसेनेच्या मंत्र्याकडूनच केराची टोपली; मास्क न घालता विजयानंतर फोटोसेशन
sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. औरंगाबादमध्ये रोजचे दिड हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाने जिल्ह्यात थैमान घातलं असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना याची चिंता दिसत नसल्याचे दिसत आहे. कारण जे लोकांना आवाहन करतात त्याच नेत्यांनी कोरोनाच्या नियमांना केराची टोपली दाखवली आहे.

झालं असं की, काल झालेल्या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीनंतर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी मास्क न घालताच निर्वाचित उमेदवारांसोबत फोटोसेशन केलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील, अर्जून गाढे, अब्दूल सत्तार आणि इतर संचालक दिसत आहेत. त्यामध्ये नितीन पाटील, राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी मास्क घातला नाही. तसेच कोरोनाचे इतर नियमांचही उल्लंघन केलेलं दिसत आहे.

किरीट सोमय्या म्हणतात, आघाडी सरकारचे अर्धा डझन मंत्री घरी जाणार

कारवाई होणार का?

काही दिवसांपुर्वी खा. इम्तियाज जलील यांच्यावर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई झाली होती. जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी, भाजपाने जलील यांच्यावर कारवाई होण्यासाठी रान उठवलं होतं. पण आता भाजप नेते आणि शिवसेनेचे नेते सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार का? हा मोठा प्रश्न सामान्य औरंगाबादकरांसमोर आहे.

चक्क तलवारीने खाऊ घातला केक! बहाद्दरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकार कोरोना अटोक्यात आणण्यासाठी झटत असताना औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या नेत्यांचे असे वागणे खटकणारे आहे. त्यामुळे सामान्य औरंगाबादकरांना वेगळे नियम आणि नेत्यांना वेगळे नियम आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सामान्यांनी नियम तोडले तर त्यांच्यावर कारवाई केली जाते, तर मंत्र्यांना वेगळे नियम आहेत का? मंत्री सत्तार यांच्यावर प्रशासनाने गुन्हा दाखल करावा. जर नाही केला तर प्रशासनाला सामान्यावर कारवाई करण्याचा कोणताही हक्क नाही.
- संजय केनेकर (जिल्हाध्यक्ष, भाजपा औरंगाबाद)