esakal | Breaking:औरंगाबाद विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय! विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या
sakal

बोलून बातमी शोधा

BAMU university exam

Breaking:औरंगाबाद विद्यापीठाचा महत्त्वाचा निर्णय! विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: सध्या राज्यात कोरोनाची रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रतिदिन जवळपास साठ हजार रुग्ण आढळत आहेत. यामुळे महाराष्ट्रात १४ तारखेपासून १ मेच्या सकाळी आठ वाजेपर्यंत लॉकडाउन जाहीर झालेले आहे. त्याअगोदर दहावी आणि बारावीच्या परीक्षाही पुढे ढकलल्याची घोषणा झाली होती.

आज (१४ एप्रिल) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०२० पदवीच्या आणि इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा २ मे पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा ३ मे २०२१ नंतर घेण्यात येतील आणि त्यावेळेस त्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी माहिती विद्यापीठाने तातडीचे पत्रक काढून दिले आहे.

तसेच ऑक्टोबर/ नोव्हेंबर २०२० पदव्युत्तर आणि इतर अभ्यासक्रमाच्याही परीक्षा स्थगित केल्या आहेत. त्या परीक्षा ५ मे २०२१ नंतर होतील. तसेच मे महिन्यातील परीक्षा जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने होण्याची शक्यता आहे. या पत्रकानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या द्वितीय सत्राच्या सर्व अभ्यासक्रमांचे ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु राहणार आहेत.