esakal | ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणा देत भाजपचे औरंगाबादेत निषेध आंदोलन

बोलून बातमी शोधा

ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणा देत भाजपचे औरंगाबादेत निषेध आंदोलन
ममता बॅनर्जी यांच्या विरोधात घोषणा देत भाजपचे औरंगाबादेत निषेध आंदोलन
sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (West Bengal Election Results2021) झालेल्या हिंसाचाराच्या (Violence In West Bengal)विरोधात बुधवारी (ता.पाच) भारतीय जनता पक्षाच्या (BJP) जिल्हा कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यात ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत निषेधाचे फलक झळकवण्यात आले. भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर (Sanjay Kenekar), खासदार भागवत कराड (Bhagwat Karad), आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde), आमदार अतुल सावे (Atul Save), माजी महापौर भगवान घडामोडी संघटक भाऊराव देशमुख, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता पालोदकर, माजी महापौर प्रमोद राठोड, माजी नगरसेवक शिवाजी दांडगे, सरचिटणीस राजेश मेहता, कार्यकारिणी सदस्या सविता कुलकर्णी यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. कोरोनाचे सर्व नियम पाळत हे आंदोलन करण्यात आले आहे. (Aurangabad Breaking News BJP Agitation Against Political Violence In West Bengal)

हेही वाचा: औरंगाबादेत १६ मेपासून हेल्मेट सक्ती, खंडपीठाने खडसावल्यानंतर पोलिसांचे ‘वरातीमागून घोडे’

पश्चिम बंगालमध्ये निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. हे केवळ सुडापोटी करण्यात आलेले आंदोलन असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली.श्री. कराड म्हणाले की, निवडणुका येतात जातात. मात्र अशा प्रकारे हल्ले करणे चुकीचे आहेत. आम्ही याचा निषेध करतो. श्री.सावे म्हणाले की, निवडणुकी दरम्यान पाच वर्षांनी होतात. यात असे वैयक्तिक प्रकारे हल्ले होण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे असे हल्ले होत असेल तर आम्ही उद्या रस्त्यावर उतरून ममता बॅनर्जीला याचा जाब विचारू असेही श्री. सावे म्हणाले. श्री. बागडे म्हणाले, प्रत्येक ठिकाणी भाजपचा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता काम करत असेल तिथे अशा प्रकारच्या हल्ले होतात. हे हल्ले आता ममता बॅनर्जी सरकारही करू लागले आहेत. तुम्ही जेवढ्या भाजप कार्यकर्त्यांना दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढे ते उफाळून बाहेर येतील तेवढे भाजप वाढेल असेही श्री.बागडे म्हणाले.