
औरंगाबाद : राज्य शासनाच्या आदेशानुसार मिशन बिगेन अगेनअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदीचा कालावधी वाढविण्यात आलेला आहे. जिल्ह्यासाठी (शहर व ग्रामीण) लागू केलेले मनाई आदेश यापुढे ता.३० एप्रिलपर्यंत (रात्री आठ ते सकाळी सात ) या कालावधीसाठी संचारबंदी आदेश लागू राहणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे आदेश काढण्यात आले आहेत.
काही बदल अशी..
१.औरंगाबाद जिल्हृयात १५ एप्रिलऐवजी आता ३० एप्रिलपर्यंत रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीमध्ये संचारबंदी आदेश लागू करण्यात येत आहेत. तसेच या कालावधी अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक शनिवार व रविवार पूर्ण लाॅकडाऊन (अत्यावश्यक वस्तु व सेवा वगळता) असेल.
२.औरंगाबाद जिल्ह्यात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण/सेवा वगळता रात्री ८ ते सकाळी ७ यावेळेत फिरण्यास प्रतिबंध असेल. मात्र यामधुन जीवनावश्यक वस्तुंचा (दूध, भाजीपाला,फळे आदी) पुरवठा करणारे, वृत्तपत्र सेवा व अत्यावश्यक सेवा पुरविणारे आस्थापना/व्यक्तींना, कोविड लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या वाहनांना वगळण्यात येत आहे. तसेच ज्या उद्योगाचे शिफ्टमध्ये कामकाज चालते, अशा संबंधित आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना व त्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना सदर आदेशामधून वगळण्यात येत आहे. घाऊक भाजीपाला व फळ विक्रेते यांची, जाधवमंडी येथे एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी महापालिका औरंगाबाद यांच्या क्षेत्रातील नऊ झोपमधील ४१ ठिकाणी विक्री ठिकाणे, वार्ड ऑफिसर यांच्या निगराणी खाली निश्चित करण्यात आले आहेत. तरी सदर विक्रेत्यांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन बंधनकारक करण्यात येऊन याबाबत त्यांना वगळण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्हृयात सर्व स्विमिंग पुल, स्पा, व्यायाम शाळा, हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रुम/बार, फुंड कोर्ट, मॉल, नाष्टा सेंटर आदी आस्थापना 30 एप्रिलपर्यंत संपूर्णपणे बंद राहतील. तथापि हॉटेल, रेस्टॉरंट, नाष्टा सेंटर आदींच्या मार्फत पार्सल सेवा/घरपोच सेवा रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहिल. रस्त्यांवरील खाद्य पदार्थांचे स्टॉल (टपऱ्या) येथे अन्नपदार्थांचे सेवन करण्यास प्रतिबंध राहिल. फक्त पार्सल घेऊन जाण्यास परवानगी राहिल.
३.सर्व ज्युस सेंटर व रसवंती गृहे बंद राहतील, फक्त पार्संल घेऊन जाण्यास परवानगी राहिल. (रात्री आठपर्यंत)
४.औरंगाबाद जिल्ह्यात सर्व आठवडे बाजार ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण बंद राहतील.
५.सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण बंद राहतील.
६.नियोजित बैठका ऑनलाईन माध्यमातून घेण्यास प्राधान्य देण्यात यावे.
वरील अंशत: बदल वगळता जिल्हा प्रशासनाने २७ मार्च रोजीच्या आदेशामधील इतर सर्व अटी व शर्ती कायम राहणार आहेत. या आदेशांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
संपादन - गणेश पिटेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.