esakal | केले रजिस्ट्रेशन अन् चक्क मिळाले कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्र
sakal

बोलून बातमी शोधा

सीरम व बिल गेट्‌स फाऊंडेशनमध्ये लस निर्मितीसाठी सहकार्य 

केले रजिस्ट्रेशन अन् चक्क मिळाले कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्र

sakal_logo
By
रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : कोविडची लस (Corona Vaccination) घेण्यासाठी मोबाईलवरुन नोंदणी केली. मात्र लस मिळण्याऐवजी चक्क लस घेतल्याचेच प्रमाणपत्र (Final Certificate For Covid-19 Vaccination) हातात पडल्याचा प्रकार आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Centre, Waluj) घडला आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावे की नाही, असा प्रश्न पडला आहे. शिवाय लस मिळेल की नाही अशी शंकाही उपस्थित होत आहे. कोरोना संसर्गाने देशात सर्वत्र थैमान घातले आहे. औरंगाबादेतही (Aurangabad) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी अनेक जण लसीकरण केंद्राकडे धाव घेत आहेत. मात्र वाळूजच्या लसीकरण केंद्रावर (Corona Vaccination Site) निष्काळजीपणामुळे सावळागोंधळ सुरू असल्याचे दिसून येते. कोरोनावर मात करण्यासाठी शासनाच्यावतीने लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. (Aurangabad Breaking News Woman Get Final Certificate For Covid19 Vaccination In Waluj)

हेही वाचा: 'पीएम केअर्स'मधून मिळाले नकली व्हेंटिलेटर्स, इम्तियाज जलीलांचा आरोप

प्रथम ४५ वर्षांवरील नागरिकांना ही लस देण्यात आली. त्यानंतर एक मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र लसीचा तुटवडा जाणवत असल्याने ही मोहीम पहिल्या टप्प्याइतकी यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. विशेष म्हणजे लस उपलब्ध नसल्याने लस घेणाऱ्यांनी अगोदर मोबाईल ॲपवर नोंदणी करा. त्यानंतरच लसीकरण केंद्रावर लस देण्यात येईल, अशी घोषणा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आली. त्यामुळे अनेकांनी नोंदणी करण्यास सुरुवात केली. मात्र तरीही लसीकरण केंद्रावर लांबच लांब रांगा लागत आहे. परिणामी कोविड नियमांचे उल्लंघनही होत असताना दिसून येते.

हेही वाचा: लसीकरण केंद्रात दिलेल्या मोबाईल नंबरचा कसा होतोय दुरूपयोग? शिरसाटांनी विचारला जाब

वाळूज (जि.औरंगाबाद) : लस मिळण्याऐवजी चक्क लस घेतल्याचेच प्रमाणपत्र हातात पडल्याचा प्रकार आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला आहे.

वाळूज (जि.औरंगाबाद) : लस मिळण्याऐवजी चक्क लस घेतल्याचेच प्रमाणपत्र हातात पडल्याचा प्रकार आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला आहे.

वाळूजमध्ये सावळागोंधळ

मोबाईल अॅपवर वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी नोंदणी करणाऱ्या यमुनाबाई कुशल साळुंके (वय ७३) या महिलेला चक्क लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळाले. या प्रमाणपत्रानुसार यमुनाबाई साळुंके यांनी ता. २८ एप्रिल रोजी वाळुज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविड लसीचा पहिला डोस घेतला. त्यांना वाळुज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एल ई लगड यांनी कोविशिल्ड ही लस दिली आहे. त्याचा क्रमांक ४१२१ झेडओ ५६ असा असल्याचे प्रमाणपत्रावर वरून दिसून येते. मात्र प्रत्यक्षात ता. २८ एप्रिल रोजी वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण मोहीमच बंद होती. त्यामुळे यमुनाबाई साळुंके यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र मिळालेच कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय त्यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले असल्याने त्यांना कोविड लसीचा पहिला डोस मिळेल की नाही. याबाबतही शंका वर्तविण्यात येत आहे. या सावळ्यागोंधळामुळे लस घेणाऱ्यांमध्ये सर्वत्र खळबळ उडाली असून लस घेण्यासाठी नोंदणी करावी की नाही. असा प्रश्नही उपस्थित केल्या जात आहे.

डॉक्टरांकडून प्रतिसाद नाही

याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र वाळुजचे डॉ. विवेक कांबळे यांच्याशी वारंवार संपर्क करूनही मी कामात व्यस्त आहे, नंतर बोलतो. असे म्हणून त्यांनी प्रतिसाद देण्याचे टाळले. त्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विचारले असता ते म्हणाले की, एखाद्या वेळेस चुकून प्रमाणपत्र दिल्या गेले असेल.