रोबोटिकच्या माध्यमातून ६५ वर्षीय वृद्धावर यशस्वी शस्त्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Carewell Multispecialist Hospital robotics surgery 65 year old man

रोबोटिकच्या माध्यमातून ६५ वर्षीय वृद्धावर यशस्वी शस्त्रक्रिया

औरंगाबाद : व्यंकटेशनगर येथील केअरवेल सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंटची सुविधा उपलब्ध करुण देण्यात आली आहे. याच माध्यमातून वाशीम येथील एका ६५ वर्षीय रुग्णावर रुग्णालयातील पहिली आणि राज्यातील दुसरी रोबोटिक पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती डॉ. अभिषेक शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यातील रुग्णांना पूर्वी गुडघे दुखी व इतर व्याधींवर आधुनिक उपचारासाठी मोठ्या शहरात जावे लागत होते. मात्र, केअरवेल सुपरस्पेशालिटी रुग्णालयातार्फे मराठवाड्यातील रुग्णासाठी अत्याधुनिक सुविधा देण्यात येत आहे. याच माध्यमातून रोबोटिक जॉईट रिप्लेसमेंटची सुविधा सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. ‘युएसएफडी’ अप्रूव्ह आणि रोबोटिक आर्म असलेली ‘रोझा रोबोटिक’ ही यंत्रणा मध्य मराठवाड्यात पहिल्यांदा केअरवेल हॉस्पिटलच्या माध्यमातून औरंगाबादेत उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्रातील हे दुसरे आणि देशातील सातवे यंत्र आहे, अशी माहिती अस्थीरोगतज्ज्ञ आणि जॉइंट रिप्लेसमेंटतज्ज्ञ डॉ. अभिषेक शिंदे यांनी दिली.

या सुविधेमुळे आता शस्त्रक्रियेत अचूकता वाढण्यास मदत होणार आहे. कमी चीर, कमी रक्तस्राव आणि रुग्णालयातून अवघ्या तिसऱ्या दिवशी सुट्टी, हे या नव्या सुविधेमुळे शक्य झाले आहे. पहिल्या रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी भुलतज्ज्ञ डॉ. शिवराज चिलवंत, डॉ. रवी चव्हाण, ओटी असिस्टंट सूरज निकाळजे, विमल मांदळे, योगेश कानडे, सागर सूर्यवंशी यांनी यासाठी मदत केले. प्रकल्पासाठी डॉ.महेश शिंदे,डॉ. विलास राठोड,डॉ. सुशील शिंदे यांचे सहकार्य मिळाले. सीईओ योगेश देशमुख यांनी या प्रकल्पासाठी मार्गदर्शन केले.

Web Title: Aurangabad Carewell Multispecialist Hospital Robotics Surgery 65 Year Old Man

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..