esakal | निर्णय झाला : चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी राजे यांचं नाव द्यावं, या मागणीसाठी शिवसेनेनं अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली आहे.

निर्णय झाला : चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी राजे यांचं नाव द्यावं, या मागणीसाठी शिवसेनेनं अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला होता. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली आहे.

चिकलठाणा विमानतळाचं नाव आता छत्रपती संभाजीराजे विमानतळ असं करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. 

चिकलठाणा विमानतळाचं नामकरण करण्याचा ठराव औरंगाबाद महापालिकेने 24 एप्रिल 2002 रोजी बहुमताने मंजूर केला होता. तो शासनाकडे पाठवण्यात आला. मात्र, तत्कालीन सरकारने याविषयी आस्था न दाखविल्यामुळे हा प्रस्ताव धूळखात पडून राहिला.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला होता. त्यानंतर या विमानतळाला "धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ' असं नाव देण्यात यावं, अशी मागणी माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

आताच्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेतला आणि गुरुवारी (ता. ५) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नामकरणाचा प्रस्ताव मंजूर केला.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...