Aurangabad : शहरात गोवरचा संसर्ग वाढताच

संशयित बालकांचा आकडा २३७ वर
Measles Vaccine
Measles Vaccinesakal

औरंगाबाद : शहरात दिवसेंदिवस गोवर आटोक्यात येण्याऐवजी संशयितांचा आकडा वाढतच आहे. गोवर संशयित बालकांची संख्या २३७ वर पोचली आहे. आतापर्यंत २३ जणांच्या चाचणीचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबवली जात आहे.

शहरात कोरोनानंतर आता गोवरचा संसर्ग सुरू झाला आहे. चिकलठाणा, नेहरूनगर, बायजीपुरा, विजयनगर, गांधीनगर, नक्षत्रवाडी, नारेगाव मिसारवाडी, भीमनगर, सातारा, बन्सीलालनगर, भवानीनगर, जयभवानीनगर, जवाहर कॉलनी, ईटखेडा, गांधीनगर, मसनतपूर, सिडको एन-११, एन-८, हर्सूल, शहाबाजार, हर्षनगर यासह शहरातील विविध भागांत आतापर्यंत गोवरचे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अनेक भागात गोवरचा संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे.

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले, ‘‘१ डिसेंबरपासून आतापर्यंत गोवरचे शहरात २३७ संशयित रुग्ण आढळून आले. या बालकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईला हाफकीन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. त्यातील काही नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. प्राप्त अहवालांमध्ये कालपर्यंत २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. रविवारी (ता. १८) आणखी एका बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २३ झाली आहे. रविवारी ज्या बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला तो बालक जिन्सी भागातील आहेत.

सहा हजार लसी दिल्या

गोवरचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात युद्धपातळीवर लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. एरव्ही बालकांना गोवर प्रतिबंधित लसींचे दोन डोस दिले जातात. यातील पहिला डोस वयाच्या ९ महिने ते १२ महिने या कालावधित तर दुसरा डोस १६ महिने ते २४ महिने या कालावधित दिला जातो. सध्या महापालिकेकडून गोवरचा डोस घ्यायचा राहून गेलेल्या बालकांना हे डोस दिले जात आहेत. याशिवाय ज्या बालकांनी दोन डोस घेतले आहेत, त्यांना अतिरिक्त एक बुस्टर डोसही दिला जात आहे.

१ डिसेंबरपासून १८ डिसेंबरपर्यंत शहरात पहिला म्हणजे एमआर १ हा डोस २२९१ बालकांना देण्यात आला आहे. दुसरा म्हणजे एमआर २ हा डोस २२०४ बालकांना दिला गेला. यासोबतच २२१२ मुलांना अॅडिशनल म्हणजे अतिरिक्त डोस देण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

घरातच आयसोलेशन

गोवरच्या संशयित रुग्णांसाठी आयसोलेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेने स्वतंत्र आयसोलेशन कक्ष सुरू केला आहे. परंतु, लहान बालकांना या कक्षात ठेवण्यास बहुसंख्य पालक तयार नाहीत. त्यामुळे ते घरीच बालकांना वेगळे ठेवत असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com