औरंगाबाद शहरात सुरू होणार १२ नवी आरोग्य केंद्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad city municipal corporation started 12 new health centers

औरंगाबाद शहरात सुरू होणार १२ नवी आरोग्य केंद्रे

औरंगाबाद - शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता महापालिकेतर्फे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत १२ ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यंत्रसामग्री व मनुष्यबळाची तरतूद झाल्यानंतर आगामी दोन महिन्यात नवीन आरोग्य केंद्र सुरू होतील, असे सूत्रांनी सांगितले.

शहराच्या विविध भागात महापालिकेतर्फे ४० आरोग्य केंद्रे सुरू आहेत. यापैकी १८ आरोग्य केंद्रे ही राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत सुरू आहेत. असे असले तरी शहराची वाढती लोकसंख्या पाहता आरोग्य केंद्रांची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रीय शहरी अभियानाअंतर्गत आणखी १२ ठिकाणी आरोग्य केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठविला होता. त्याला मंजुरी मिळताच महापालिकेने आरोग्य केंद्रांच्या जागाही निश्चित केल्या आहेत.

आवश्यक यंत्र सामग्रीची खरेदी व मनुष्यबळाची नियुक्तीची केल्यानंतर आगामी दोन महिन्यात केंद्र कार्यान्वित केली जातील, असे सूत्रांनी सांगितले. या आरोग्य केंद्रांमध्ये बाह्य रुग्ण विभाग, रक्त, लघवी तपासणीची सोय राहील व इतर तपासण्या होतील. मोफत औषधी उपलब्ध असेल.

याठिकाणी होणार आरोग्य केंद्र

 • जाधववाडी-सुरेवाडी

 • भगतसिंगनगर-मयूरपार्क

 • सावित्रीनगर-चिकलठाणा

 • न्यू एसटी कॉलनी एन- २, सिडको

 • राजनगर मुकूंदनगर

 • हर्षनगर मनपा इमारत

 • मिटमिटा पडेगाव

 • गुरुसहानीनगर एन-४

 • रेणुकामाता मंदिर परिसर, बीड बायपास

 • वीटखेडा कांचनवाडी

 • बालानगर

 • महेशनगर

Web Title: Aurangabad City Municipal Corporation Started 12 New Health Centers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..