Aurangabad: शहरात १० लाख लसीकरणाचा टप्पा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

औरंगाबाद : शहरात १० लाख लसीकरणाचा टप्पा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : दिवाळीच्या सणामुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती मंदावली होती. मात्र 'हर घर दस्तक’ मोहिमेमुळे पुन्हा एकदा लसीकरचा आकडा वाढत आहे. शुक्रवारी (ता. १२) शहरात लसीकरणाचा १० लाखांचा टप्पा पूर्ण झाला.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्यासाठी आठ नोव्हेंबरपासून हर घर दस्तक मोहीम सुर करण्यात आली. त्यात आशा स्वयंसेविकांमार्फत २३ हजार १५ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शुक्रवारी नऊ हजार १४२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात लसीचा एकही डोस न घेतलेले पाच हजार ५५८ स्त्रिया व पाच हजार ८७४ पुरुष आढळून आले. तसेच पहिला डोस घेतलेले १० हजार पाच लाभार्थी व दुसरा डोस घेतलेले सात हजार ५७५ लाभार्थी आढळून आले.

हेही वाचा: मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

दुसरा डोस न घेणारे १४०४ स्त्री व १३२० पुरुष लाभार्थी यांना जवळच्या केंद्रावर लसीकरण करून घेण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान ९२३ लाभार्थ्यांनी पहिला डोस व ४२६ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला, त्यामुळे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या १० लाख एवढी झाली असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.

एकुण उद्दीष्ट : १०,५५,६००

पहिला डोस घेतलेल्यांची संख्या : ६,२४,०८८

दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या : ३,८१,५५२

loading image
go to top