हॅलो... कोरोना प्रतिबंधक दुसरा डोस लवकर घ्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना प्रतिबंधक दुसरा डोस

हॅलो... कोरोना प्रतिबंधक दुसरा डोस लवकर घ्या!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिका, जिल्हा प्रशासनातर्फे विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासोबतच ज्यांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधून ‘तुमचा दुसरा डोस राहिला आहे, तो लवकर घ्या’ असे आवाहन केले जात आहे. वॉर रुम, लसीकरण केंद्रावरून दररोज ४०० ते ५०० जणांसोबत संपर्क साधला जात असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवून आघाडी घेणाऱ्या औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण मात्र कमी आहे. राज्याच्या तुलनेत औरंगाबाद जिल्हा २६ व्या क्रमांकावर असून, केवळ ५५ टक्के लसीकरण झाले आहे. लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन पद्धतीने बैठक घेऊन सूचना केल्या. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी ‘लस नाही तर प्रवेश नाही आणि प्रवासही नाही’ असा नारा दिला आहे.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

त्यासोबतच ‘दस्तक हर घर’ मोहीम राबविली जात आहे. आशा स्वयंसेवक घरोघरी जाऊन लस घेतली का याची विचारणा करत आहेत. ज्यांनी लस घेतली नाही, त्यांना जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच ज्यांनी पहिला डोस घेतला आहे मात्र दुसरा डोस घेण्यास टाळाटाळ करत आहेत, अशा नागरिकांसोबत संपर्क साधला जात आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या वॉर रूम व लसीकरण केंद्रावरून फोनवर संपर्क साधला जात असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

नागरिकांचा वाढतोय प्रतिसाद

दिवाळी सणात लसीकरणाचे प्रमाण झपाट्याने घटले होते. मात्र, प्रशासनाने काही दिवासांपासून सुरू केलेल्या मोहिमेनुसार लसीकरणाची गती हळहळू वाढत आहे. आता दररोजचा आकडा पाच ते सहा हजारांपर्यंत आला असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले. दरम्यान ज्या भागात लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे, तिथे प्रशासकाने जनजागृतीचे काम सुरू केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

loading image
go to top