Corona Updates: औरंगाबादेत १३३५ जण कोरोना पाॅझिटिव्ह, चोवीस तासांत १७ रुग्णांचा मृत्यू

Aurangabad Corona Updates
Aurangabad Corona Updates

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत मृतांची संख्या १३६८ वर गेली आहे. रुग्णसंख्या वाढीचा झपाटा कायम असून बुधवारी (ता.१७) दिवसभरात एक हजार ३३५ रुग्णांची भर पडली. त्यात शहरातील ९६२ तर ग्रामीण भागातील ३७३ जणांचा समावेश आहे. बरे झालेल्‍या आणखी ४४२ जणांना सुटी देण्यात आली.


श्रद्धा कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष, सिडको एन-९ मधील ६८ वर्षीय पुरुष, इंदिरानगरातील ५८ वर्षीय महिला, मुकुंदवाडी येथील ७५ वर्षीय पुरुष, तांदुळवाडी, लासूरगाव येथील ६० वर्षीय महिला, पळशीतील ५५ वर्षीय पुरुष, सिडको एन-६ येथील ४० वर्षीय महिला, बीड, बायपास भागातील ५५ वर्षीय महिला, इंदिरानगरातील ५१ वर्षीय महिला, वाकड (ता. कन्नड) येथील ५० वर्षीय पुरुषाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. बालाजीनगर, क्रांती चौक भागातील ३८ वर्षीय पुरुष, सिडको एन-४ येथील ७१ वर्षीय महिला, सिडको एन-सहा येथील ७० वर्षीय पुरुष, गादिया विहार येथील ८८ वर्षीय पुरुष, बीड बायपास भागातील ८२ वर्षीय पुरुष, चंद्रगुप्तनगरातील ९२ वर्षीय पुरुष, सिडको एन-६ मधील ६८ वर्षीय पुरुषांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.


औरंगाबादेतील बाधित : परिसर (कंसात रुग्णसंख्या) पानदरीबा (४), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह (१), अयोध्या नगर (१), बंजारा कॉलनी (१), सातारा परिसर (१५), देवगड औरंगाबाद (१), टी.व्ही.सेंटर (३), न्यू विशाल नगर (३), म्हाडा कॉलनी (२), एन-५ (१२), हनुमान नगर (१०), चिकलठाणा (८), जय भवानी नगर (७), एमजीएम होस्टेल (२), एन-१ (६), एन-६ (१), इंदिरा नगर (२), एन-२ (१०), मयूर पार्क (२), विजय नगर (१), लेबर कॉलनी (१), मुकुंदवाडी (११), संजयनगर (२), गारखेडा (१६), जाधववाडी (१), राजनगर (५), रोकडिया हनुमान कॉलनी (२), प्रभानगर (१), सारा सिटी पैठण रोड (१), देवानगरी (१), बीड बायपास (१६), टिळक नगर (१), शिवाजी नगर (१३), कैलास नगर (१), सुराणा नगर (१), सेवन हिल (१), आकाशवाणी (२), एन-९ (४), हर्सूल (१), पुंडलिक नगर (७), एन-१२ (२१), हडको कॉर्नर (१), पहाडसिंगपुरा (१), सिद्धी पार्क सारा वैभव (१), आंबेडकर नगर (१), विश्रांती नगर (२), जयभवानी नगर (३), राजीव गांधी नगर (१), विठ्ठल नगर (१), उत्तरा नगरी (२), शहानूरवाडी (२), अंबिका नगर (१), नंदीग्राम सोसायटी (१), पार्वती नगर (१), एन-४ (७), सूतगिरणी चौक (४), न्यू कॉलनी (१), ठाकरे कॉलनी (१), छत्रपती नगर (१), गजानन नगर (४), टाऊन सेंटर (१), ब्रिजवाडी (१), मूर्तिजापूर म्हाडा कॉलनी (१), विद्याधन कॉलेज (१), देवळाई (३), अशोक नगर (१), एन-३ (१), राजा बाजार (३), सराफा बाजार (२), श्रेय नगर (५), छावणी (४), ज्योतीनगर (६), औरंगाबाद (२), उल्कानगरी (९), बालाजी नगर (३), बेगमपुरा (१), पडेगाव (४), पेठेनगर (१), पदमपुरा (९), नवाबपुरा (१), गरमपाणी (१), गुलमंडी (१), बिसमिल्ला कॉलनी (१), रेल्वे स्टेशन (५), एम्स हॉस्पिटल (२), वेदांत नगर (३), सिडको (१), दर्गा रोड (१), चिश्तिया कॉलनी (१), एकनाथ नगर (१), शहानूरवाडी (१), ईटखेडा पैठण रोड (३), सारा गार्डन आशीर्वाद रो हाउसेस (१), स्वामी विवेकानंद नगर (२), जानीपुरा (१), सिंधी कॉलनी (३), रामनगर (१), खाराकुंआ (१), नागेश्वरवाडी (३), उस्मानपुरा (१६), मिटमिटा (१), खोकडपुरा (१), सन्मित्र कॉलनी (१), गजानन कॉलनी (१), आदित्यनगर (३), गुरू रामदास नगर (१), भीमनगर भावसिंगपुरा (२), समर्थ नगर (२), चेलीपुरा (५), न्यू नंदनवन कॉलनी (२), मारोती नगर (१), चिंतामणी कॉलनी (१), एसबीआय (३), दशमेश नगर (२), पैठण गेट (१), अमृतसाई प्लाझा (१), बन्सीलाल नगर (५), कांचनवाडी (४), एमआयडीसी कॉलनी (३), पोतदार इंटरनॅशनल स्कूल (१), कासलीवाल मार्वल (१), एस.बी.कॉलनी (१), अमृतसाई सारा सिटी (१), उस्मानपुरा म्हाडा कॉलनी (४), गाढे नगर (१), रामानंद कॉलनी (२), क्रांती नगर (१), म्हसोब नगर हर्सूल (२), सुदर्शन नगर हडको (१), मयूरपार्क (२), भगतसिंगनगर (१), आरोग्यम हॉस्पिटल (१), राजेसंभाजी कॉलनी हर्सूल (१), होनाजी नगर हर्सूल (२), एन-११ (१), निसर्ग कॉलनी भावसिंगपुरा (१), आदित्य नगर हर्सूल (१), पॉवर लूम एमआयडीसी चिकलठाणा (१), कटकट गेट शरीफ कॉलनी (२), भवानी नगर जुना मोंढा (१), लेबर कॉलनी (१), सौदामिनी हाउसिंग सोसायटी (१), स्वरूप कॉलनी सिडको (१), संकल्प नगर हडको (१), मेहेर नगर (२), शिवशंकर कॉलनी (१), मित्र नगर (१), औरंगपुरा (१), विजय चौक (१), प्रताप नगर (१), भानुदास नगर (१), बनबट नगर (१), गिरिजा देवी हौसिंग सोसायटी (१), बाळापूर नगर (१), देशमुख नगर (१), दिशा संकुल शिवाजी चौक (६), मातोश्री नगर (१), गुरुसहानी नगर (१), साईनगर (२), वसंत विहार (२), आदर्श कॉलनी (१), एन-७ (७), एन-८ (२), आईसाहेब नगर हर्सूल (१), आनंद नगर (१), श्रेयस नगर (१), केंब्रिज चौक (२), नक्षत्रवाडी (४), समता नगर (१), साईकृष्ण अपार्टमेंट पैठण रोड (१), राहुल नगर (२), पन्नालाल नगर (२), दिशा संस्कृती पैठण रोड (१), रचनाकार कॉलनी (१), विद्यापीठ परिसर (१), राजू नगर (१), अजब नगर (१), परिजात नगर (२), रामनंद कॉलनी (१), श्रीकृष्ण नगर दर्गा (१), गौतम नगर (१), जवाहर कॉलनी (१), शाकार नगर (१), एमजीएम स्पोर्टस् बिल्डिंग (१), उद्योग शेंद्रा बीबीपी (१), एमजीएम स्टाफ (१), अन्य (४८०). एकूण- ९६२.

ग्रामीण भागातील बाधित : रांजणगाव शेणपुंजी (१), बिडकीन (१), शेंद्रा (२), पिसादेवी (२), जैतपूर (१), हिरापूर साईनगर (१), जोगेश्वरी वाळूज (२), रांजणगाव (४), खुलताबाद (१), हसनाबाद कन्नड (१), पिशोर कन्नड (२), पैठण (३), जयहिंद नगरी पिसादेवी (२), सावंगी हर्सूल (१), बजाजनगर (२३), पाटोदा (१), कमलापूर वाळूज (१), सिडको महानगर (११), वडगाव (५), सलामपुरे वडगाव (४), एमआयडीसी वाळूज (२), गंगापूर (२), गांधेली (१), आडगाव बुद्रुक (१), रवींद्र नगर (१), अन्य (२९७). एकूण ३७३.  
 

कोरोना मीटर

- आतापर्यंतचे बाधित- ६१४३५
- उपाचार घेणारे- ७५५२
- बरे झालेले- ५२५१५
- आतापर्यंतचे मृत्यू- १३६८

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com