esakal | दिलासादायक! औरंगाबादेत कोरोना रुग्णसंख्या घटली; ८४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात

बोलून बातमी शोधा

दिलासादायक! औरंगाबादेत कोरोना रुग्णसंख्या घटली; ८४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात
दिलासादायक! औरंगाबादेत कोरोना रुग्णसंख्या घटली; ८४ हजारांपेक्षा जास्त रुग्णांची कोरोनावर मात
sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: आज (ता. १३) नवीन १ हजार ३५२ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. आता एकूण रुग्णांची संख्या १ लाख १ हजार ५३६ झाली. सध्या १५ हजार ३५० जण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आज घाटीसह विविध रुग्णालयात २१ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार २५ जणांचा मृत्यू झाला. आज १ हजार ४३८ जणांना सूटी झाली. आजपर्यंत ८४ हजार १६१ जण बरे होऊन घरी परतले आहेत.

२१ कोरोनाबाधितांचा मृत्यू-

घाटी रुग्णालयात १४ जणांचा मृत्यू झाला. यात गंगापूर येथील पुरुष (६७), सिल्लोड येथील पूरूष (६४), जाधववाडी येथील पुरुष (३५), पैठण येथील पुरुष (६४), इतावा ता. औरंगाबाद येथील महिला (५८), भावसिंगपूरा येथील पुरुष (५६), रामनगर येथील पुरुष (७५), दौलताबाद येथील महिला (७०), वैजापूर येथील महिला (८५), सिल्लोड येथील महिला (६५), नागेश्‍वरवाडी येथील पुरुष (८०), पडेगाव येथील पुरुष (४५), सातारा परिसर येथील पुरुष (४३), घाटी रुग्णालय येथील महिला (५२) कोरोनाबाधितांचा समावेश आहे.

जिल्हा सामान्य रूग्णालय चौघांचा मृत्यू झाला. यात फर्दापूर, सोयगाव येथील पुरुष (६५), हर्सुल सावंगी येथील पुरुष (६७), शिवनेरी कॉलनी येथील महिला (५०), पुरूष, देवळाई रोड येथील पुरुष (६८) यांचा समावेश आहे. खासगी रुग्णालयात तिघांचा मृत्यू झाला. यात स्त्री,नायगव्हाण, फुलंब्री येथील महिला (५०), पुरूष, इटखेडा, पैठण रोड येथील पुरुष (६८), पुरूष, बीड बायपास येथील पुरुष (३९) जणांचा समावेश आहे.

कोरोना मीटर-

बरे झालेले रुग्ण - ८४१६१

उपचार घेणारे रुग्ण - १५३५०

एकुण मृत्यू - २०२५

आतापर्यंतचे बाधित - १०१५३६