Corona Vaccination : औरंगाबादेत पाच दिवसांत ६० हजार लसीकरण

Corona Vaccine
Corona VaccineSakal
Summary

दररोज १३ ते १४ हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. त्यासाठी ६९ केंद्रांच्या माध्यमातून कोव्हिशील्ड लस दिली जात आहे.

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी Corona Vaccination शहरातील तरुणांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. शासनाने १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतल्यापासून म्हणजेच गेल्या पाच दिवसांतच सुमारे ६० हजार जणांचे लसीकरण महापालिकेतर्फे Aurangabad Municipal Corporation करण्यात आले आहे. दररोज सरासरी १३ ते १५ हजार जणांना डोस दिले जात असल्याने शहरातील लसीकरणाचा चार लाखांचा टप्पा पूर्ण Aurangabad Corona Vaccination Updates झाला आहे. शहरात २२ जूनपासून १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होताच जोरदार प्रतिसाद मिळत आहे. दररोज १३ ते १४ हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे. त्यासाठी ६९ केंद्रांच्या माध्यमातून कोव्हिशील्ड लस Covishield Vaccine दिली जात आहे. गेल्या पाच दिवसांत मिळालेल्या प्रतिसादामुळे एकूण लसीकरणाचा आकडा वाढला आहे. २० जूनपर्यंत शहरात तीन लाख ३९ हजार ८२७ जणांचे लसीकरण झाले होते. त्यात १८ ते ४४ वयोगटातील २७ हजार ३०१ नागरिकांनी पहिला डोस घेतलेला होता. गुरूवारी (ता.२४) तीन लाख ९३ हजार १५३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले. त्यात १८ ते ४४ वयोगटातील तरुणांची संख्या ७६ हजार ७६५ एवढी आहे. शुक्रवारी (ता.२५) दिवसभरात १२ हजारांपेक्षाही अधिक लसीकरण झाल्याने शहराने चार लाखांच्या लसीकरणाचा टप्पा पार केला. २१ ते २५ या मागील पाच दिवसांतच सुमारे ६० हजार जणांनी कोरोना Corona लस टोचून घेतली आहे. aurangabad corona vaccination updates within five days 60 thosand people vaccinated

Corona Vaccine
वाळूतस्कराने तलाठ्याला दगडाने मारहाण करत दिली धमकी

पहाटेपासूनच रांगा

महापालिकेने काही केंद्रांवर दिवसभरात २०० तर काही केंद्रावर १०० लस देण्याचे नियोजन केले जात आहे. को-विन ॲपवर Co-win App नोंदणी केलेल्यांना थेट लस मिळत आहे. तर लसीकरण केंद्रावर येणाऱ्यांना टोकन दिले जात आहे. टोकन घेण्यासाठी अनेक केंद्रांवर नागरिक पहाटे साडेपाच वाजल्यापासून रांगा लावत असल्याचे चित्र आहे.

लसीकरणाचे टप्पे

- एक लाखाचा टप्पा : १ एप्रिल

- दोन लाखांचा टप्पा : २४ एप्रिल

- तीन लाखांचा टप्पा : २९ मे

- चार लाखांचा टप्पा : २५ जून.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com