
औरंगाबाद : सुरवातीच्या काळात गंमत वाटणारा लॉकडाउन वृद्धांसह मुलांचीही डोकेदुखी बनला आहे. याकाळात लहान मुले दिवसभर मोबाईलला चिकटून आहेत, याचा वाईट परिणाम त्यांच्या मानसिक व शारीरिक स्थितीवर होत आहे. त्यामुळे मुलांमध्ये एकलकोंडेपणा, चिडचिडेपणा, एकाग्रतेचा अभाव आदी गोष्टी वाढीस लागण्याची शक्यता मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
चिडचिड, राग कमी करण्यासाठी काय करावे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून मार्गदर्शन केले. लॉकडाउनमुळे घरी थांबून दिवसभर काय करावे, हा मोठा प्रश्न सर्वांसमोर निर्माण झाला आहे. महिलावर्गाला दिवसभर काही ना काही काम असल्यामुळे त्यांच्यावर जास्त परिणाम झालेला नाही; मात्र पुरुष मंडळी आणि मुलेही दिवसभर घरात आहेत.
हे ही वाचा - शाळांच्या अनुदानाची वाट मोकळी
लॉकडाउनच्या काळात कामच नसल्यामुळे लहान मुले दिवसभर मोबाईलवर गेम खेळणे, कार्टून बघणे, आपल्या आवडीची गाणं ऐकणे आदी प्रकार करीत आहेत. जवळपास सर्वच बालकांना मोबाईलचं व्यसन जडलं असून, याचा वाईट परिणाम होत असून पालकांनी सांगितलेल्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे पालकांचीही चिडचिड वाढलेली आहे. चिडचिड कमी करण्यासाठी डॉ.
अष्टपुत्रे यांनी दिलेल्या महत्त्वाच्या टिप्स.
का होते चिडचिड?
-
- दैनंदिन जीवनातील रुटिंग बदलल्याचा परिणाम
- असुरक्षिततेची भावना मनात निर्माण झाली आहे
--
हे करा
- घरातील दैनंदिन कामाचे नियोजन करा
- घरातील एकमेकांचे विचार घ्या, नियोजनाबाबत चर्चा करा
- स्वतःचे आत्मपरीक्षण करा, वेळेचा सदुपयोग करायला शिका
- मुलांना काम सांगताना एका वाक्यात ठामपणे सांगा
- दररोज कुटुंबातील सर्वांना एकत्र घेऊन एक खेळ खेळा
- मुलांकडे कॅमेऱ्यासारखे लक्ष ठेवू नका, थोडी मोकळीक द्या
- त्यांना वारंवार सूचना देऊ नका
Aurangabad - coronavirus How To Reduce Anger, Doubles Of The Lackdown
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.