
दारू का पितात म्हणतं मुलाने केला स्वतःच्या वडिलांचा खुन
चित्तेपिपंळगाव (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद तालुक्यातील चिंचोली येथे दारू का पिता व व्यसनी मिञासोबत का राहतात असे म्हणतं मुलाने स्वतःच्या वडिलांना लोखंडी राॅडने जबर मारहाण केल्याची घटना पोलिस ठाणे चिकलठाणा हद्दीतील चिंचोली (औरंगाबाद) येथे (ता. 2.) रोजी रात्री दहाच्या घडली चिकलठाणा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कडूबा भाऊराव घुगे (वय 65 )यांना त्यांचा लहान मुलगा नानासाहेब कडूबा घुगे( वय 25) याने तुम्ही दारू का पिता व दारुड्या मित्रासोबत का राहता या कारणावरून लोखंडी घन डोक्यात घालून जीवे ठार मारले आहे.
तसेच आरोपी मुलाने त्याचा मोठा भाऊ मछिद्र कडूबा घुगे( वय 27 ) याला पण लोखंडी घणाने हातावर, पाठीवर मारहाण करून जखमी केले आहे. मयत व जखमी यांना औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात पुढील कार्यवाही साठी पाठवले असून. मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार 302 खुन्हाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलगा नानासाहेब कडूबा घुगे याला चिकलठाणा पोलीसांनी लगेच ताब्यात घेतले आहे. पुढिल तपास चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री गात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस शरदचंद्र रोडगे हे करतं आहे.
Web Title: Aurangabad Crime Boy Drink Alcohol Father Murder
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..