Aurangabad : वाळूज परिसरात धारदार शस्राने पत्नीचा खून, पती फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Crime
Aurangabad : वाळूज परिसरात धारदार शस्राने पत्नीचा खून, पती फरार

Aurangabad : वाळूज परिसरात धारदार शस्राने पत्नीचा खून, पती फरार

वाळूज (जि.औरंगाबाद) : फारकत घेतलेल्या पत्नीला भेटायला आलेल्या पतीचा पत्नी बरोबर वाद झाल्याने पतीने पत्नीचा धारदार शस्राने निर्घृण खून केला. ही घटना वाळूज (Waluj) परीसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे गुरुवारी (ता.१८) रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील शिवकन्या किरण खिल्लारे (वय २३) हिचा पती किरण खिल्लारे याच्या सोबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादामुळे शिवकन्या ही किरण पासून फारकत घेऊन आई जनाबाई कैलास सतावे (वय ५२, रा परभणी, गौतमनगर) हिच्यासोबत रांजणगाव (शेणपुंजी) येथील पवार यांच्या घरात किरायाने राहत होती. गुरुवारी आरोपी किरण केशव खिल्लारे (वय ३५) हा देहगाव (जि.नांदेड) येथून पत्नी शिवकन्या हिला भेटण्यासाठी रांजणगाव येथे आला होता. रांजणगावात घरी आल्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास सासू जनाबाई ही घराबाहेर होती. यावेळी (Aurangabad) किरण व शिवकन्या यांच्या वाद झाला.

हेही वाचा: आमदार निलंगेकर, कराडांसह अडीचशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

या दोघामधील वाद विकोपाला गेल्याने आरोपी किरण खिलारे याने काहीतरी धारदार वस्तूने पत्नी शिवकन्या हिच्यावर सपासप वार करत तिला गंभीर जखमी केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडताच आरोपी किरण घरातुन फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त वनमाला वनकर, सहायक पोलिस आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या हल्ल्यात गंभीर जखमी शिवकन्या हिस उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

आरोपी जाळ्यात

पत्नीचा खून करून आरोपी फरार झाल्याचे लक्षात येताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी वेगवेगळे पथक तयार करून आरोपीच्या शोधार्थ रेल्वे स्टेशन व बस स्टॅन्ड बसस्थानकाकडे रवाना केले. आरोपी हा नांदेड जिल्ह्यातील असल्याने तो नांदेडकडे जाणार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येऊन कितीही एक पथक रवाना केले. दरम्यान आरोपी किरण खिल्लारे हा रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

loading image
go to top