आमदार निलंगेकर, कराडांसह अडीचशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल | Sambhaji Patil Nilangekar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhaji Patil Nilangekar
आमदार निलंगेकर, कराड यांच्यासह अडीचशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

आमदार निलंगेकर, कराडांसह अडीचशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

निलंगा (जि.लातूर) : निलंगा येथे महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) निषेधार्थ गुरूवारी (ता.१८) भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह हजारो नागरिकांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. या प्रकरणी आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar), आमदार रमेश कराड (Ramesh Karad) यांच्यासह इतर अडीचशे कार्यकर्त्यांवर निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की, महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देणारे आंदोलनकर्ते निलंगेकर व कराड यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आंदोलन केले. यामध्ये हजारो शेतकरी (Latur) सहभागी झाले होते.

हेही वाचा: Latur : निलंग्यात राज्य शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध

अखेर पोलिस नाईक प्रणव काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलंगेकर, कराड, समाज कल्याणचे माजी सभापती संजय दोरवे, दगडू सोळुंके, पंचायत समिती सभापती राधा बिराजदार, अप्पाराव सोळुंके, शाहूराज थेटे, विरभद्र स्वामी, शाहूराज पाटील यासह अडीचशे कार्यकर्त्यांवर बेकायदेशीर मंडळी जमवून राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवल्या प्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस विभागाकडून कोणती कारवाई होणार याकडे संपूर्ण लातूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

loading image
go to top